भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१
बारामती : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : वेळ सकाळी पण काळजाचा ठेका चुकवणारी कोणाचाही विश्वास बसणार नाही अशी आक्रोश आणि टाहो फोडणारी घटना आणि हा…हा….म्हणताच महाराष्ट्रच काय संपूर्ण देशच हळहळ व्यक्त करू लागला आणि दादा नावाची पॉवर नियतीने केव्हाच घड्याळासह हिरावून घेतली ! याचा विश्वासच जनतेत बसत नव्हता. आणि बसणारही कसा ? हो दादा आपल्यात नाही असे खरोखर डॉक्टरने जाहीर केले तर संपूर्ण राज्यातून जनतेचा लोट बारामती कडे जाऊ लागला तर अनेकांनी आक्रोशही केला मंत्री रडू लागले अशी भयानक सकाळ महाराष्ट्रातील जनतेच्या नशिबी उजाडली आली दादांची राष्ट्रवादी दादा विना सुन्न झाली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज सकाळी ९ वा. सुमारास विमान अपघातात दुःखत निधन झाले. दादांसह पायलट शांभवी व अन्य चार असे सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना विमान लँडिंग होत असताना घडली.एक निर्भीड , जशास तसे उत्तर देणारा नेता आणि कामाची तळमळ असणारा नेता अजितदादा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ख्याती होती. पॉवर फुल नेता म्हणून त्यांची ओळख होती.ती पॉवरच नियतीने आता हिरावून घेतल्याने सर्व नेते , कार्यकर्ते पोरके झाले आहेत.तर मंत्री सुद्धा सुन्न झाले आहेत की होत्याचे नव्हते कसे झाले ? हा मोठाच प्रश्न नियतीने मंत्री , कार्यकर्ते यांच्या पुढे उभा केला आहे.संपूर्ण महाराष्ट्र दुःख सागरात बुडाल्याने बारामतीत अनेकांनी हंबरडा फोडला आहे. तर या नेत्याचे अचानक एक्झिट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
उद्या सकाळी काठेवाडीला ६ ते ९ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून
गुरुवार( दि. २९) रोजी सकाळी ११ वा.अजितदादा यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
तिनदिवसांचा दुखवटा जाहीर
दिवंगत नेत्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ जानेवारी ०२६ ते ३० जाने.०२६ पर्यंत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला.
राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविणे : २८ ते ३० जाने.या काळात राज्यातील ज्या सर्व इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो तिथे तो अर्ध्यावर ( Half Mast ) फडकवण्यात यावा.
शासकीय कार्यालयांना सुट्टी : २८ ते ३० जानेवारी पर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर शासकीय मनोरंजन कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. दुखवटा तीन दिवसांच्या कालावधीत कोणताही अधिकृत शासकीय करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.





