Home Breaking एस.के.डी .स्कूलच्या विद्यार्थ्यांचे संचलन स्पर्धेत शिस्त व देशभक्तीचे प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक

एस.के.डी .स्कूलच्या विद्यार्थ्यांचे संचलन स्पर्धेत शिस्त व देशभक्तीचे प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक

0
51
Oplus_131072

भारत पवार : राज्य मुख्यसंपादक  :  ९१५८४१७१३१                                                       देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  

के.टी.एच.एम. कॉलेज नासिक, येथे भारतीय सैन्य दिनानिमित्त आयोजित आंतर शालेय संचलन स्पर्धेत एस.के.डी.चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित, एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल भावडे, येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलनाचे प्रदर्शन करत, प्रथम क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धा मार्शल कॅडेट फोर्स महाराष्ट्र या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली होती. यात एकूण 25 नामांकित शाळांनी सहभाग घेतला होता.एस.के.डी.विद्यालयाकडून एकूण 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक मुद्दसर सय्यद,ययाती जाधव,ललित शिरसाठ,किरण चव्हाण,मंजुषा शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे प्राचार्य एस.एन. पाटील, संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्कृष्ट संचलनासाठी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here