Home Breaking सामान्य रुग्णालय आणि नर्सिंग कॉलेज मालेगाव येथे एड्स दिन साजरा

सामान्य रुग्णालय आणि नर्सिंग कॉलेज मालेगाव येथे एड्स दिन साजरा

0
59
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना, मो. ९१५८४१७१३१                 मालेगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव येथील सामान्य रुग्णालय आयसीटीसी विभाग आणि शासकीय नर्सिंग कॉलेज यांच्या मार्फत एड्स दिन साजरा करण्यात आला. यावेळी पथनाट्य आणि रांगोळी काढून जनतेत एचआयव्ही, एड्स या गंभीर आजारांना वेळीच रोखण्या साठी  जनजागृती करण्यात आली .

रुग्णालय परिसरात एड्स या गंभीर आजाराविषयी रॅलीचे व रांगोळी प्रदर्शन तसेच पथनाट्यमार्फत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे  वैद्यकीय अधीक्षक योगेश पाटील ,  अतिरिक्त शल्य चिकित्सक मोमीन अन्सारी , मेट्रन श्रीमती. रेखा माळी. नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्रीमती. ज्योती मोपगार. उपस्थित होते तसेच उपस्थितांना डॉक्टर संदीप खैरनार देवेंद्र भामरे व विलास लोंढे, किरण सागर यांनी आजाराविषयी मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  देवेंद्र भामरे यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आनंद जाधव, किरण खरे, मधुकर शेवाळे व शासकीय नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य शिक्षक व सामान्य रुग्णालयातील कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here