Home Breaking बॉल बॅडमिंटन स्पर्धेत व्हि.के.डी.विद्यालयाच्या संघाची विभागीय स्तरावर निवड

बॉल बॅडमिंटन स्पर्धेत व्हि.के.डी.विद्यालयाच्या संघाची विभागीय स्तरावर निवड

0
66
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक तथा राज्य उपाध्यक्ष _  लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना , मो. ९१५८४१७१३१

देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय 14 वर्षाखालील मुलींच्या बॉल बॅडमिंटन स्पर्धेत व्ही.के.डी.इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भावडे,येथील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात वाजे विद्यालय सिन्नर चा दणदणीत पराभव करत.व्हि.के.डी. विद्यालयाचा संघ विभागीय स्तरासाठी पात्र झाला.विजयी संघाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक निलेश भालेराव,आकाश वाडीले यांचे मार्गदर्शन लाभले.संघातील खेळाडू अनीषा मोरे, समृद्धी देवरे, ईश्वरी काकुळते, सृष्टी रौंदळ, जान्हवी बच्छाव, तन्वी देवरे,अक्षरा मोरे, अनुष्का बच्छाव,ईश्वरी भामरे, हर्षदा सावकार यांचे व्हि.के.डी.विद्यालयाचे प्राचार्य एन.के.वाघ, एस.के.डी विद्यालयाचे प्राचार्य एस.एन. पाटील संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे,सेक्रेटरी मीना देवरे तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सागर कैलास,बबलू देवरे,हेमंत शिंदे यांनी अभिनंदन केले व पुढील विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here