Home Breaking ” महाराष्ट्र न्यूज ” च्या उपसंपादक पदी विलास माळी यांची नियुक्ती...

” महाराष्ट्र न्यूज ” च्या उपसंपादक पदी विलास माळी यांची नियुक्ती , सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

0
92
Oplus_0

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक                     विलास माळी  : राज्य उपसंपादक  _          आपल्या परिसरातील बातम्या, ताज्या घडामोडी तसेच ,जाहिराती  निर्भीड , सडेतोड आणि परखड पणे मांडून संपूर्ण राज्यात अगदी काही सेकंदात घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहोचण्यासाठी संपर्क करा _ ९१५८४१७१३१  / ९९२३५०३६२१                         देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : तब्बल ३ लाख २९ ह. + पेक्षा अधिक वाचक संख्या असलेल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि सडेतोड , निर्भीड , निर्णायक लिखाण असलेले ” महाराष्ट्र न्यूज ” ह्या न्यूज चॅनल साठी देवळा येथील विलास माळी यांची  उपसंपादक पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीचे वृत्त समजताच अनेक चाहत्यांनी त्यांचे कौतुक करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

हॉटेल दुर्गा येथे छोटेखानी समारंभात नियुक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माळी यांचा अधिकारी आणि जनतेशी दांडगा संपर्क असून त्यांची काम करण्याची लकब सुद्धा वेगळीच आहे.त्यामुळे त्यांचा संपर्क जिल्हाभरात आहेच परंतु लवकरच महाराष्ट्रभर वर्किंग नेटवर्क उभारण्यात येईल असे ही यावेळी माळी यांनी बोलतांना सांगितले.

विलास माळी यांची संपूर्ण महाराष्ट्र राज्य साठी उपसंपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते खास माझे विश्वासू  व जवळचे सहकारी आहेत. माळी अभ्यासू , मनमिळाऊ तर आहेतच पण Tit for Tat ( जशास तसे ) असे व्यक्तिमत्व असल्या कारणाने मी विश्वासाने त्यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी दिली ते मोठ्या हिमतीने व जिद्दीने ते पार पाडतीलच यात शंका नाही . सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेकांना चांगले सहन होत नसल्याची बिमारी जडलेली असून त्यांचे पाय मागे ओढण्यासाठी प्रयत्न देखील होतील परंतु जो कोणी त्यांचे पाय ओढेल त्याला ते विनोदाने त्याचे हात मागे करून त्याच्या शैलीत त्याला उत्तर देतील अशी मला खात्री आहे. असे मत राज्य मुख्य संपादक भारतराज पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी भारतराज पवार , हॉटेल दुर्गा चे संचालक संदेश गुंजाळ  , पोलिस मित्र संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष रवींद्र केदारे यांच्या हस्ते विलास माळी यांचा शाल , श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्य संपादक यांचा शाल , श्रीफळ देऊन सगळ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

तर मुख्य संपादक साहेबांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि टाकलेली जबाबदारी याची मला जाणीव असून यास मी कुठलाही तडा जाऊ देणार नाही हे नक्की की , पाय मागे ओढण्याचे प्रकार जर झालेच त्यास नक्कीच तसे उत्तर दिले जाईल पण माझ्या मुख्य संपादकांच्या विश्वास सार्थ करणार त्यास तडा जाऊ देणार नाहीच.असे मत विलासजी माळी यांनी शेवटी व्यक्त केले.

 

डावी कडून  राज्य मुख्यसंपादक भारतराज पवार हे  विलास माळी यांना राज्य उप संपादक नियुक्तीचे  ओळख पत्र प्रदान  करताना समवेत  पदाधिकारी ..
महाराष्ट्र न्यूज चे राज्य मुख्यसंपादक भारतराज पवार यांचा सत्कार करताना  डावीकडून  हॉटेल दुर्गा चे संचालक संदेश गुंजाळ, राज्य उपसंपादक विलास माळी , रविंद्र केदारे . ( छाया चित्रात दिसत आहेत  )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here