Home Breaking …… त्या ना _ लायक असलेल्या माणसाच्या हातून माझे उखळ पांढरे झाले...

…… त्या ना _ लायक असलेल्या माणसाच्या हातून माझे उखळ पांढरे झाले ! आता तरी प्रामाणिक पणाने कुणीतरी मला वाचवा हो ..!! टाहो वसाकाचा तर आ. डॉ.राहुल आहेर यांची भकास कारखान्यासाठी अर्थ मंत्र्यांसोबत झकास बैठक

0
87
Oplus_0

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक , विलास माळी : राज्य उपसंपादक  : आपल्या परिसरातील  सडेतोड परखड बातम्या  आणि जाहिराती साठी संपर्क करा . मो. ९१५८४१७१३१ / ९९२३५०३६२१.             देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  कसमादे तालुक्याचे वैभव आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे नंदनवन असलेले वसंत दादा सहकारी साखर कारखाना अर्थात वसाका आज तरी अर्ध मेला अवस्थेत कसा तरी उभा आहे.तर ह्याच कारखान्याचे सर्वच कामगार देशोधडीला लागले तर काही मयत सुद्धा झाले. इतके पुण्य आणि कामगार कामगारांच्या कुटुंबाचा तळतळाट घेऊन बसलेला तो ना _ लायक असलेल्या माणसाच्या हाती मला माझ्याच सभासदांनी देऊन माझे उखळ पांढरे केले आणि मी स्वतःच नाही तर त्या काळी मलाई खाणारे माझे सभासद त्यांचेही आज उखळ पांढरे झाले आहे आणि आज ते सुद्धा मरण यातना भोगत आहेत तर काही सभासद , कर्मचारी मेले सुद्धा. आता तरी प्रामाणिक पणाने कुणीतरी मला वाचवा असा टाहो वसाका कारखाना करतो आहे असे कारखान्याचा आज उभा असलेला सांगाडा पाहून वाटते .

गत २० ते २५ वर्षापूर्वीची घटना सांगता येईल कसमादे परिसरात ह्या कारखान्याने वैभवाची कात टाकली होती .शेतकरी बांधवांना अत्यंत सुगीचे दिवस आले होते तर कर्मचारी वर्गाची दिवाळी होती.आज सगळ्यांचे त्या ना _ लायक माणसाने दिवाळे काढले.तर स्वतःचे मात्र पोटकल्याण  करून घेतले.हे जेव्हा घडले तेव्हाच काही सुज्ञ , वैचारिक मंडळींनी लागलीच साखर आयुक्त यांचेकडे धाव घेतली परंतु त्याकाळचे साखर आयुक्तांनी सुद्धा डोळे लावल्या सारखे करून घेतले.आज कारखान्याचे कर्मचारी देशोधडीला लागले , काही मेले सुद्धा .सांगा कुठे फेडणार रे हे पाप ? ज्यांची लायकी नव्हती त्यांना त्यावेळी आणि त्या काळच्या सभासदानी त्यास डोक्यावर  घेतले आणि त्याने सभासदांच्या डोक्यावर बसून सभासदानच भस्मसात करून कार्यक्रम करून टाकला. आसनी आणि सगळ्यांनाच देशोधडीला लाऊन स्वतः मात्र मलई दार झाला हे नक्की.

सध्या  वसाका चालू होणे ही काळाची गरज आहे ही जाणीव ठेवून चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी वसाका सुरू करून परिसरातील कळवण ,सटाणा,मालेगाव , देवळा ,चांदवड,नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे नंदनवन होईल अशीच अपेक्षा ठेऊन नुकतीच महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सोबत भकास कारखान्यासाठी झकास बैठक बैठक घेऊन  चर्चा करण्यात आल्याचे समजते.लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यासाठीं मी सातत्याने पाठपुरावा करणार असेही आमदार डॉ.राहुल आहेर यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.

वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना, विठेवाडी ( देवळा ता.) याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक उपाय योजनांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री ना.अजितदादा पवार यांच्या दालनात बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.परिसरातील आर्थिक , औद्योगिक  वैभव राहिलेला हा कारखाना सध्या बंद अवस्थेत तर आहेच परंतु फक्त निर्जीव स्वरूपाचा सांगाडा उभा आहे.इतकी ह्या कारखान्याची वाईट अवस्था आज आहे. आपण त्याच्याकडे पहावे आणि तो ( कारखाना ) आपल्याकडे आशाळ  भूत नजरेने पाहत असतो आणि कुणीतरी मला वाचवा हो…. जणू काही असा टाहो फोडतो आहे. ऊसउत्पादक शेतकरी , सभासद व कर्मचारी वर्ग यांचे हित लक्षात घेता कारखाना सुरू करणे त्यास पुनरज्जीवन करणे अत्यावश्यक आहे या पार्श्वभूमीवर मा.उपमुख्यमंत्री यांच्या दालनात संबंधित विभागाचे मंत्री , सहकारी संस्था ,  बँक प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत आर्थिक , प्रशासकीय व अन्य बाबींवर चर्चा करण्यात आली.

लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असे आश्वासन लोकप्रिय आ.डॉ.राहुलदादा आहेर यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजितदादा पवार यांचे समवेत उजवीकडून  लोकप्रिय आ.डॉ.राहुल दादा आहेर आणि समस्त अधिकारी वर्ग  वसाका कारखाना सुरू  करण्या बाबत चर्चा करतांना  .  कटा  महाराष्ट्र न्यूज  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here