अभिमन जाधव पोस्ट विभागातून ” अभिमानाने ” सेवानिवृत्त ! अनेकांना आनंदही आणि दुखःही

0
8
Oplus_0

भारतराज पवार  : राज्य मुख्यसंपादक                      आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क  : ९१५८४१७१३१                                            देवळा  / माळवाडी  : कटा महाराष्ट्र न्यूज  ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : गावातील पोस्टमन म्हटले की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसून येते. मग वयोवृध्द असो की तरुण, तरुणी असो. आणि ही झलक तरुणांमध्ये अधिक असते परंतु अधिक वयोवृद्धांवर अधिक असायची. त्याचे कारण असे की, माझा मुलगा _ मुलगी बाहेर गावी  शिकण्यास किंवा नोकरीस आहे .त्याचे किंवा तिचे काही लेटर / पत्र किंवा पूर्वीची मनीऑर्डर वगैरे काही आलेय का ? किंवा येईल का ? याची उत्सुकता लागून असायची आणि ती उत्सुकता आपले सगळ्यांचे पोस्टमन पूर्ण करायचे. सध्या मोबाईलचा जमाना आलाय सध्याचे जाऊ द्या. पण पोस्टमन विषयी आस्था तेव्हाही आणि आजही तेवढीच अधिक आहे.

आपण सगळ्यांना माहिती आहेच की ” माझ्या मामाचे पत्र हरवले …. ! ” तेच पत्र घरी आणून देण्याचे काम अगदी अविरत पणाने पोस्टमन करत असतो. त्यात त्याचा तो प्रामाणिक पणा , त्याची सोज्वळता , त्याची ती कर्तव्यता  याची याची आशा तुम्हा आम्हा सगळ्यांना असते. आणि असाच आमचा पोस्टमन अभिमन कारभारी जाधव आज त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून मोठ्या अभिमानाने सेवानिवृत्त होत आहेत. हा आमचा गावकऱ्यांचा अभिमान आहे. त्यांच्या सेवानिवृत्त निमित्ताने सगळ्यांनाच आनंद तर आहेच आणि दुखःही तितकेच आहे. आनंद असा की , पोस्टमन म्हटले आणि तो घरी येतोय किंवा त्याने दाराशी येऊन आरोळी मारली आपल्या चेहऱ्यावर कामाचा कितीही ताण असू द्या तो आवाज ती आरोळी ऐकताच चेहऱ्यावर आनंदाची झलक उमटायचीच.  चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हताच. कारण त्याने दिलेली टपाल यातच मोठे समाधान असायचे.आणि असते. टपाल अनेक प्रकारची असते. त्या टपालीत काय दडलय ? हे पाहणे ते वाचण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते . आणि ही उत्सुकता , हा आनंद पोस्टमन कधी देऊन जाईल ही आणखी मोठीच शिगेला पोहोचलेली उत्सुकता असते. ती पूर्ण करण्याचे काम पोस्टमन करत असतो.आज निवृत्त होणारे आमचे पोस्टमन अभिमन जाधव यांनी आज पावेतो अनेक तरुण , तरुणींच्या जिवनात आनंदाची बहर आणलेली आहे. हे विसरता कामा नये. त्यांचे चेहऱ्यावर कायम स्मित हास्य , बोलके व्यक्तिमत्व विशेष म्हणजे न बोर करणारे व्यक्तिमत्व असलेले आणि न बोलणाऱ्या माणसास बोलते करणारे  ही कला जोपासणारे पोस्टमन अभिमन जाधव यांची ख्याती आहे. Lp ह्या टोपण नावाने सर्वदूर परिचित असलेले जाधव यांची  मटाने गावी  बदली झाली होती. तब्बल दीड दोन वर्षाचा कालावधी झाला तरी गावी माळवाडी येथे अभिमन  जाधव यांची बदली होत नव्हती.आणि जाधव यांना थोडसे अडगळणीचे झाले होते.कारण एकदा सकाळी घरून गेले की संध्याकाळीच केव्हा तरी घरी यावे लागायचे.त्यामुळे दुपारच्या जेवणाची सुद्धा गैरसोय व्हायची. शेवटी पोस्टमन अभिमन जाधव यांनी मला ( भारतराज पवार यांना ) सांगितले की माझी गावी बदली होत असेल तर बघ.मी तात्काळ मालेगावच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून सांगितले की , आमचा गावचा पोस्टमन आमच्या गावीच पाहिजे.त्यांची बदली करून द्या. आणि लागलीच एका आठवड्याने जाधव यांची बदली माळवाडी गावी करण्यात मला यश आले. कोणाही पैसा न घेता. तेही आज पावेतो.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण करून पोस्टमन होण्याचे स्वप्न साकारले. आणि अनेकांचे स्वप्न टपाल रूपाने त्यांनी साकारले.हे विशेष. गरिबीतून संसाराचा गाडा पार करत असताना त्यांनी स्वतःच्या पत्नीस अर्थात आमच्या वाहिनीस लग्नानंतर शिकविले आणि त्यांनाही शिक्षिका बनविले. आज त्यांना दोन मुलं आहेत. तेही नावारूपास आलेली. लहान पुणे येथे इंजिनिअर तर मोठा मुलगा राजकारणात रमणारा आहे. असा आमचा कर्तबगार पोस्टमन आज सेवानिवृत्त होत आहे हा आनंद तर आहेच. परंतु दुःख याचे की , टपाल घेऊन येणारा आरोळी मारणारा आवाज आज पासून कानास ऐकू येणार नाही. त्यांचे स्मित हास्य पहावयास मिळणार नाही आणि टपाल कितीही महत्वाची असो , अर्जंट असो टपाल मालक जरी घरी नसला तरी अडवणूक नको म्हणून टपाल घरी देऊन जाणारे अभिमन जाधव यांचा आम्हास कायम  अभिमान राहणार . अशी सेवा देणारे पोस्टमन माळवाडी व अन्य गावासाठी घडोत.  त्यांच्या या सेवानिवृत्त निमित्ताने माझ्या कडून , महाराष्ट्र न्यूज परिवाराकडून , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून   तसेच समस्त पवार कुटुंबीयांकडून खूप खूप शुभेच्छा .

शुभेच्छुक : भारतराज पवार , राज्य मुख्यसंपादक                        महाराष्ट्र न्यूज ( वेब चॅनल) आणि   

                     कसमादे टाइम्स ( साप्ताहिक )

                       तथा राज्य उपाध्यक्ष _ अखिप भारतीय                  भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती .                       * जिल्हा कार्याध्यक्ष _ माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ , मुंबई .

प्रमोदकुमार पवार , पत्रकार ,  ९१५८४१७१३१

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here