भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो. ९१५८४१७१३१
चांदवड : कटा. महाराष्ट्र न्युज ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी – बहुप्रतिक्षित नार पार प्रकल्पास राज्यपालांनी मान्यता दिल्याने कसमादेसह खांदेशात आनंदाचे वातावरण असले तरी बांधभाऊ म्हणवल्या जाणाऱ्या चांदवड चा या योजनेत कुठेही नामउल्लेख नसल्याने चांदवडकरांची समस्या जैसे थे राहणार आहे. दरम्यान याबाबत आता चांदवडकर सर्व नेत्यांनी एकत्र येत लढा उभा करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा येणाऱ्या अनेक पिढ्या विद्यमान लोकप्रतिनिधींना अकार्यक्षम नेत्तुव म्हणून लक्षात ठेवतील अशी भूमिका मांडत येणाऱ्या काळात पाण्याबाबत आक्रमक भूमिका घेण्याची वेळ आली तरी चालेल पण हा प्रश्न मार्गी लावू असे मत डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये व्यक्त केले.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या चार दशकांहून अधिक काळ नारपार प्रश्नावर राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रात बरसणाऱ्या पर्जन्यातून उपलब्ध होणार पाणी मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात वाहून जात आहे. हे पाणी गिरणा खोऱ्यात वळवून कित्येक शेतकऱ्यांच सुजलाम सुफलाम शेतीचे स्वप्न साजरे होणार आहे. केंद्राकडून सहकार्याची अपेक्षा असताना केंद्राने हात वर केले मात्र, राज्य सरकारने स्वतःच्या हिंमतीवर हा प्रकल्प तडीस नेण्याचा संकल्प करून मोठी आशा खांदेश, कसमादे पट्यात निर्माण केली आहे. मात्र चांदवडकर जनता मात्र तहानलेलीच राहणार असल्याने आगामी काळात नार पार च हे पाणी पेटण्याची शक्यता आहे.
चांदवड तालुक्यातील काही भूभाग तापी खोऱ्यात अन् उर्वरित गोदावरी खोऱ्यात येतो. गोदावरी खोऱ्यातील चांदवड हा एकमेव तालुका दुष्काळी म्हणून गणला जातो. प्रत्येक तालुक्याला ह्या ना त्या मार्गाने पाण्याची व्यवस्था असताना चांदवड तालुकाच कायम तहानलेला राहिला आहे. अल्पभूधारक शेतकरी त्यातही कायम पावसाच्या पाण्यावर अवलंबून येथील कृषी व्यवस्था असल्याने बारमाही पाण्यासाठी ठोस नियोजनाची भूक तालुक्याला आहे. शेतीच घटणार उत्पन्न, नैसर्गिक आपत्ती, बेरोजगारांचा मोठा प्रश्न तालुक्यात ” आ ” वासून उभा आहे. अशा परिस्थितीत नारपार प्रकल्पाची व्याप्ती वाढवून चांदवडकरांना न्याय देणे अपेक्षित असताना चांदवड तालुका वंचित ठेवला गेल्याने कित्येक पिढ्यांच भविष्य कोरडच राहणार आहे. येत्या काळात इथले लोकप्रतिनिधी चांदवडसाठी पाणीदार भूमिका घेतील की ‘ कोरडेच ‘ राजकारण करतील याकडे आता तालुक्याचे लक्ष लागून आहे.
प्रतिक्रिया
चांदवड तालुक्याचं असं वंचित राहण मनाला वेदना देणारं आहे. नार पार प्रकल्पाचा लाभ चांदवडला देखील मिळायला हवा अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय रहाणार नाही. आंदोलनाची पातळी कितीही टोकाची असली तरी तशी भूमिका घेणं आता क्रमप्राप्त झालं आहे.
– डॉ. आत्माराम कुंभार्डे.
–





