Home Breaking मालेगाव तालुक्यातील हृदयद्रावक घटना : महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी ” महाराष्ट्र न्यूज”...

मालेगाव तालुक्यातील हृदयद्रावक घटना : महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी ” महाराष्ट्र न्यूज” वरती ! मासेमारीचा ” मोह ” अतिउत्साही तरुणांच्याजीवावर गेला ,पण….

0
88
Oplus_0

भारत पवार : राज्य मुख्यसंपादक                             आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा – ९१५८४१७१३१                           मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज  : ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक मीडिया वेब चॅनल : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाल्याने अनेक धरणातून नद्यांना पाणी सोडल्यामुळे नद्यांना पूर आल्याने बग्यांची गर्दी होत आहे तर प्रशासनाने नदीकिनारी राहणाऱ्या सर्व रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा यापूर्वीच दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील संवदगाव शिवारातील काही अति उत्साही तरुणांना मासे मारीने भुरळ घातल्याने त्यांच्यावर चांगलीच बेतली होती. गेल्या १५ तासांपासून हे तरुण जीवघेण्या परिस्थितीशी झुंज देत होते.काळ आला होता पण वेळ नव्हती असेही ह्या मासेमारी बहादरांबद्दल येथे बोलले जात आहे.

मालेगाव तालुक्यातील संवदगाव येथील १५ तरुणांना मासे मारण्याचा मोह झाला. धरणे ओव्हरफ्लो झाल्याने येथील गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागली.त्यातच ह्या तरुणांना मासे मारण्याचा मोह झाल्याने हे १५ ही तरुण नदीत उतरून मासे पकडण्याचा कार्यक्रम करू लागली.परंतु कळवण तालुक्यातील चनकापूर धरण आणि बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने त्यातील पाणी गिरना नदीत सोडल्याने पाण्यात पाणी वाढल्याने नदीस केव्हाच पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने ह्या तरुणाच्या लक्षात न आल्याने हे तरुण नदीपात्राच्या मोठ्या खडकावर अडकल्यामुळे त्यांच्या जीवावर खूपच बेतली होती तर त्यांच्या घरच्या लोकांनी अक्षरशा हंबरडा फोडला होता तर हे तरुण नदीच्या पाण्यात अडकल्यामुळे प्रशासनास आव्हान ठरले होते.गेल्या १५ तासांपासून मालेगावचे अग्नीशामक दलाचे जवान तरुणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते.परंतु नदीस जास्त पाणी असल्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरत होते.या परिस्थितीवर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे जातीने लक्ष ठेऊन होते.यावेळी मालेगावचे आमदार मुप्ती इस्माईल हे सुद्धा उपस्थित होते.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घ्या घटनेकडे लक्ष ठेऊन होते.

सगळ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरल्या नंतर अखेर भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.आणि पाच पाच तरुणांच्या समूहाने मासेमारी करणाऱ्या सर्व तरुणांना बाहेर सुरक्षितरित्या काढण्यात आले.जर हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन केले नसते तर ? तर मोठा अनर्थ घडला असता अशी जोरदार चर्चा मालेगाव व तालुक्यात होतेय.

यासाठी मालेगाव स्थित असलेले लाडके नेतृत्व ना.दादा भुसे यांनी जातीने लक्ष ठेवत हे ऑपरेशन सक्सेस केल्याने त्यांनी सुद्धा सुटकेचा श्वास सोडला.हे विशेष.

ह्या तरुणांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर त्यांच्या जवळ मासेमारी करण्यासाठीचे साहित्य असल्याचे सांगितले गेले.तर मेडिकल तपासणी साठी पोलीस घेऊन जाणार असल्याचे आ. मुप्ती इस्माईल यांनी यावेळी सांगितले.

असल्या प्रकारचा धोका टाळण्यासाठी तरुणांनी मुळातच नदी किंवा नदीकाठावर जाऊ नये तसेच चणकापूर व हरणबारी धरण झाल्याने धरणाच्या परिसरातील सर्व गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात असल्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.तसेच स्थानिक पोलीस पाटील , मालेगावचे आमदार, मालेगाव मनपाचे आयुक्त, पोलीस प्रशासन आदींसह अनेक अधिकारी याकामी प्रयत्नशील होते.असेही भुसे यांनी यावेळी सांगितले.

मासेमारीचा मोह अतिउत्साही तरुणांच्या जीवावर गेला …. काळ होता पण वेळ नव्हती. ! असे म्हणून बघणाऱ्या अनेक जणांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Oplus_0
Oplus_0
Oplus_0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here