राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा आज वाढदिवस : महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक भारत पवार, संपादक संजय बोर्डे यांनी दिल्या शुभेच्छा …!

0
24
Oplus_131072

 (रुपाली ताई चाकणकर वरील छायाचित्रात दिसत आहेत.)                                                             भारत पवार  : राज्य मुख्य संपादक                      निर्भिड , रोखठोक आणि सडेतोड बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क.मो. ९१५८४१७१३१          मुंबई : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  आज ३१ मे
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या व महाराष्ट्र महिला आयोगाच्या #रुपाली_चाकणकर यांचा वाढदिवस.
जन्म.३१ मे
अत्यंत कमी वेळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीची महिला आघाडी समर्थ करण्यात महत्वाचा वाटा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांचा नगरसेविका ते प्रदेशाध्यक्षा व सध्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा असा प्रवास आहे.
दौडमधील शेतकरी कुटुंबातील बबन बोराटे यांच्या त्या कन्या. त्यांचे शिक्षण रयत संस्थेतील साधना कॉलेजमध्ये झाले. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्याने पुढे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. विधानसभा निवडणुकीच्या आधी काही दिवसच राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्ष सोडला होता. त्याच वेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, आणि जयंत पाटील यांनी बारा तासाच्या आत त्यावेळी पुण्याच्या शहराध्यक्ष असणाऱ्या चाकणकर यांची प्रदेशअध्यक्ष पदी निवड केली होती. या काळात राष्ट्रवादीचे अनेक मातब्बर नेते सोडून जात होते. पक्ष संकटात आला होता. निवडणुकीत पक्षाला किमान तीस ते चाळीस जागा मिळतील की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. अशा कठीण काळात प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी चाकणकर यांनी पेलली. कठीण वेळात पक्षाला चाकणकार यांनी साथ दिली, अशी वेळोवेळी चर्चा होत असते.
शोध पत्रकारितेचा बादशहा लोकनायक संजय बोर्डे**8652274588
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here