प्रा.यशवंत गोसावी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या स्टार प्रचारक पदी नियुक्ती :” महाराष्ट्र न्यूज”तर्फे अभिनंदन

0
24

भारतराज पवार : मुख्य संपादक                              वेळ कमी मतदार संघ जास्त म्हणून अगदी काही सेकंदात महाराष्ट्रतील प्रत्येक घरा घरात आणि प्रत्येक मतदरात आपण व आपले कार्य पोहचणार ” महाराष्ट्र न्यूज” ह्या ऑन लाईन वेब पोर्टल द्वारे सुमारे दोन लाख ५७ ह.+ वाचकांपर्यंत.संपर्क करा: मो.९१५८४१७१३१

मुंबई : कटा.महाराष्ट्र न्यूज ऑन लाईन वेब पोर्टल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील रहिवासी आणि माळवाडी गावाचे नाव साता समुद्र पार पोहचविणारे प्रा. यशवंत गोसावी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या स्टार प्रचारक पदी निवड करण्यात आल्याने महाराष्ट्र न्यूज ऑन लाईन वेब चॅनल तर्फे आणि पवार परिवारातर्फे गोसावी यांचे अभिनंदन करण्यात आले.

यशवंत गोसावी गेल्या १o वर्षांपासून शिवव्याख्याते अर्थात शिवचरित्रकार म्हणून काम करत आहेत ह्या कामात आजपर्यंत त्यांचा हाथ कोणीच धरू शकले नाही इतके प्रख्यात शिवव्याख्याते म्हणून गोसावी यांची ख्याती आहे. यानिमित्ताने त्यांनी माळवाडी गावाचे नाव साता समुद्रापार पोहचवले असून यांचा आम्हा गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे.

शिवव्याख्याते म्हणून गोसावी यांची अनेक व्याख्याने शरद पवार साहेबांनी स्वतः ऐकली आहेत. उत्कृष्ट व अष्टपैलू व्याख्याता म्हणून यशवंत ( मिथुन ) गोसावी ओळखले जाऊ लागले.त्यामुळेच की काय सद्ध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ अनेक दिग्गज स्टार प्रचारक नेत्यांबरोबरच यशवंत गोसावी यांची नियुक्ती शरद पवार साहेबांनी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अनेक उमेदवारांचे विजयाचा आलेख उंचावत जाणार यात शंकाच नाही.

पुनश्च गोसावी आणि शरद पवार साहेबांचे या निमित्ताने महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक भारत पवार यांचे तर्फे धन्यवाद व अभिनंदन .

वेळ कमी मतदार जास्त म्हणून अगदी काही सेकंदात महाराष्ट्र भरातील प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचविण्यासाठी अर्थात महाराष्ट्रातील दोन लाख ५७ ह.+ वाचकांपर्यंत पोहचा ” महाराष्ट्र न्यूज”  ह्या ऑनलाईन वेब चॅनल द्वारे.अगदी अल्प दरात. संपर्क करा मो.९१५८४१७१३१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here