डॉ.आशुतोष मगर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल तर्फे अभिनंदन !

0
21

भारतराज पवार  : मुख्य संपादक.                            ” अवतरले रामराज्य” म्हणून रामनवमी व मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा निमित्ताने ” शुभेच्छा जाहिराती साठी” अवश्य संपर्क करा. आपण दिलेली जाहिरात अवघ्या काही सेकंदात महाराष्ट्र भरात २ लाख ५६ ह. + लोकांपर्यंत अल्प दरात पोहचणार …चला तर मग संधीचे सोने करा आणि संपर्क करा.मो. ९१५८४१७१३१
मालेगाव :  कटा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क: मालेगाव  तालुक्यातील साकुर ( उपखेड ) येथील डॉ.आशुतोष भगवानराव मगर हे वैद्यकीय क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ अशी मानाची एम.बी.बी. एस . ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने मालेगाव व मालेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल तर्फे मगर यांचे अभिनंदन करण्यात आले. डॉ.आशुतोष मगर हे डॉ.नितीन वसंतराव पाटील यांचे शालक आहेत. डॉ.आशुतोष यांनी  नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठातून एम.बी.बी.एस उत्तीर्ण झाले. त्यांच्या आई सेवानिवृत्त शिक्षिका आहेत व वडील वनाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत आज त्यांनी त्यांच्या गावातून प्रथम एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळवला असल्याने साकुर गावात त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून नाशिक जिल्ह्यात गावाची शान वाढविल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. तर डॉ. आशुतोष मगर गावातील पहिले एमबीबीएस डॉक्टर ठरल्याने ते गावासाठी अभिमानाचा विषय ठरले आहेत त्यांचे पुढे एमडी होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होवो अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल चे मालेगाव तालुका अध्यक्ष डॉ. संदीप पाटील , मालेगाव तालुका उपाध्यक्ष राकेश रौंदळ , मालेगाव तालुका प्यारा मेडिकल चे अध्यक्ष संकेत बेडसे यांनी दिल्या असून त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. 💐🌹🙏💉💊🩺🩻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here