मुंबईत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत पत्रकार संमेलन ! नविन पदाधिकाऱ्यांच्या होणार नियुक्त्या

0
61

भारतराज पवार : मुख्यसंपादक , संजय बोर्ड : कार्यकारी संपादक.                                                 आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१  

मुंबई : ( कटा ) कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  : महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन च्या वतीने १० एप्रिल ०२४ रोजी मुंबई मध्ये पत्रकार संमेलन आयोजित करण्यात आले असून संमेलनास  केंद्रीय मंत्री रामदास आठवले , मित्र मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह आमदार नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे महाराष्ट्र  पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र न्यूजचे कार्यकारी संपादक संजय बोर्डे , महाराष्ट्र राज्य प्रवक्ता पत्रकार विक्रम खरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांनी एप्रिल महिन्याच्या 10 तारखेला मुंबईमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी ,विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे ,मालाड विधानसभेचे आमदार असलम शेख, बोरिवली विधानसभेचे आमदार सुनील राणे, चारकोप विधानसभेचे आमदार योगेश सागर, कांदिवली विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर, दहिसर विधानसभेचे आमदार मनीषा चौधरी,व उत्तर मुंबई जिल्ह्यातील सर्व नगरसेवक सर्व पार्टीचे कार्यकर्ते यांना निमंत्रित करत आहोत. यावेळी आपण **महाराष्ट्राचे प्रसिद्ध झुणका भाकर**याचा आयोजन करणार आहोत तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये **महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या**सर्व पदाधिकारी यांची नियुक्त पत्र व ओळखपत्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत तरी सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमास कोणी कुठेही असो यायचे जर या कार्यक्रमास कोणी पदाधिकारी उपस्थित राहिला नाही तर त्यांचे सदस्यत्व बरखास्त करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रक
विक्रम खरे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन यांनी काढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here