आता नाही तर कधीच नाही ध्येय फक्त मराठा आरक्षण…!आरक्षण फक्त मराठवाड्यातील मराठाच घेणार काय ?

0
119

भारत पवार  : मुख्य संपादक    मो.९१५८४१७१३१        औरंगाबाद : कटा.टाइम्स महाराष्ट्र न्यूज  वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क ग्राउंड रिपोर्ट : कुबेरबापू जाधव : आरक्षण फक्त मराठवाड्यातील मराठ्यांनाच पाहिजे काय ? हि गर्दी फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाची आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा Rdअजूनही झोपेतच आहेत. आपण झोपले आहात की झोपेचं सोंग घेऊन बसलात ह्यावर एकदा स्वतःच्या मनाला विचारुन बघा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहे. आज संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला मुंबईत जाण्याची गरज आहे. मराठवाड्यातील, विदर्भातील , इतर भागातील मराठा जितक्या ताकदीने समाजासाठी लढत आहे. तितक्या ताकतीने पश्चिम महाराष्ट्रातील मराठा दिसत नाही. सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांनी विचार करा ही वेळ पुन्हा नाही. आत्ता आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून घराबाहेर पडलो नाही तर समाजांचे खुप मोठं नुकसान होणार आहे. संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एक आहे आणि जेवढी आरक्षणाची गरज मराठवाड्यातील मराठा समाजाला आहे तेवढीच आपल्याला सुद्धा आहे. आपल्या पुढच्या पिढीसाठी, घरातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या नोकरी साठी आज संघर्षात सहभागी व्हावे. आज नाही सहभागी झालात पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत.गरज सर्वांना आहे हे लक्षात घ्या प्रत्येक घरातील मराठा बांधवांने यायलाच लागतंय एकमराठा लाखमराठा .
आमचा राम मुंबईला.निघालाय _ 

आता ध्येय फक्त मराठा आरक्षण.!!” आमचा राम मुंबईला निघालाय घरावर तुळशी पत्र ठेवून. मराठ्यांनो मराठ्या सारखे वागा, छत्रपतींचे वारसदार ध्येय आणि कर्तव्यावर ठाम असतात. लक्ष भरकटून देऊ नका राम कालही होते आजही आहेत उद्याही राहतील पण मनोज दादा जरांगे पाटील आणि त्यांनी समाजासाठी उभा केलेला लढा परत नाही, योग्य वेळी योग्य भुमीका घ्यायला शिका. गोल गोल भुमीकेने सकल मराठा समाजाचे आयुष्य पाखंडी लोकांच्या चक्रीवादळात सापडलंय, मराठा नेत्यांनी केलेली चुक समाज म्हणून आपण करु नका भानावर या. हीच योग्य वेळ आहे, ध्येय गाठण्याची. आपली भक्ती आणि श्रध्दा मनात असते ती प्रदर्शनाची बाब नाही हे मराठा बांधवांनी लक्षात ठेवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here