Home Breaking देवळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शिक्षकांसाठी विशेष उद्बोधन कार्यशाळा संपन्न

देवळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शिक्षकांसाठी विशेष उद्बोधन कार्यशाळा संपन्न

0
2
Oplus_131072

भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१.                                                      देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :

दि.१२ जून,२०२६ रोजी प्रेम, भक्ती, अध्यात्म आणि जीवनमूल्यांचा अनमोल संदेश देणाऱ्या प्रेम भक्ती साधना केंद्र, श्री सिद्धारूढ आश्रम, निवाणे  येथे देवळा एज्युकेशन सोसायटी  यांच्या वतीने सर्व शिक्षकांसाठी विशेष उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना अध्यात्म, संस्कार आणि चारित्र्यनिर्मितीची नवी दिशा देणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी परमपूज्य प्रेमुर्ती मनिषा दीदीजी    आणि  देवळा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव  आदरणीय प्रो.डॉ.सौ.मालतीताई आहेर  मॅडम

Oplus_131072

यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.ज्ञान, संस्कार आणि सद्विचारांचा प्रकाश समाजात अखंड तेवत राहावा, या मंगल भावनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांना संबोधित करताना परमपूज्य प्रेममूर्ती मनिषा दिदिजी यांनी जीवनमूल्ये, मानवी संस्कार आणि शिक्षकांच्या आदर्श भूमिकेवर अत्यंत प्रभावी व हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा शिल्पकार असतो. त्यामुळे शिक्षकांनी प्रथम स्वतःचे चारित्र्य, आचरण आणि नैतिक मूल्ये जपली पाहिजेत, असे त्यांनी विशेषत्वाने सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये सत्य, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, मानवता, धर्मनिष्ठा आणि संस्कारांचे बीजारोपण करण्याचे महान कार्य शिक्षकांच्या माध्यमातूनच घडते.यासाठी शिक्षकांनी स्वतःच्या विचारांमध्ये सातत्याने सकारात्मक परिवर्तन घडवत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मार्गदर्शनादरम्यान त्यांनी धर्म, अध्यात्म, मानवी जीवनाची मूल्ये, सदाचार, ध्यानधारणा (मेडिटेशन), मानवी सिद्धांत, संत साहित्य, *भगवद्गीतेतील गीता रहस्य*, *मनाचे श्लोक* तसेच विविध संत-महात्म्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचा उल्लेख करून उपस्थितांना अंतर्मुख केले. आधुनिक युगातील ताणतणाव, स्पर्धा आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीत अध्यात्म आणि संस्कारांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.
त्यांच्या प्रत्येक विचारातून शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच नव्हे, तर त्यांचे चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, हा मोलाचा संदेश अधोरेखित झाला. उपस्थित शिक्षकांनीही या मार्गदर्शनाचा मनःपूर्वक स्वीकार करत आपल्या अध्यापन कार्याला नव्या उर्जेची आणि प्रेरणेची जोड मिळाल्याची भावना व्यक्त केली.
या प्रेरणादायी कार्यशाळेस देवळा एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांतील शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अध्यात्म, संस्कार, चिंतन आणि आत्मपरीक्षणाच्या वातावरणात पार पडला.
ज्ञानाच्या मंदिरात अध्यात्माचा दीप प्रज्वलित करणारी आणि शिक्षकांना नव्या विचारांची दिशा देणारी ही कार्यशाळा उपस्थितांच्या मनावर दीर्घकाळ स्मरणात राहील, अशीच ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here