मुंगेरीलाल के हसीन सपने,नौटंकी मालेगावी चालणार नाही, संजय राऊत एक दलाल – ना.दादा भुसे

0
456

(वरील छाया चित्रात मंत्री दादा भुसे यांनी मालेगावी तातडीची पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी बोलताना दिसत आहेत .)                                 भारत पवार  : मुख्य संपादक.                                  आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती आणि पत्रकार नियुक्ती साठी अवश्य संपर्क साधावा. संपर्क  : ९१५८४१७१३१                             मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी खा.संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा मालेगाव कोर्टात दाखल करण्यात आलेल्या केस मध्ये  आज दि.२ डिसेंबर ०२३ रोजी संजय राऊत मालेगाव कोर्टात जामीना साठी हजर राहिले असता पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी ना.दादा भुसे यांचे विरुद्ध शब्दसुमने उधळल्याने याप्रसंगी भुसे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी मंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शेतकऱ्यानं कडून १७८ कोटी रुपये गोळा केले असा राऊत यांनी खोटा आरोप केला आहे. त्यावेळी मी सभागृहा मध्ये याचे उत्तर दिलेले आहे.आणि मीडिया, पत्रकारां मार्फत महाराष्ट्रातील जनतेस सुद्धा माहित केले आहे.राऊत म्हणाले आमची सत्ता आल्यास दादा भुसे यांना तुरुंगात जावे लागणार या विषयी भुसे यांना पत्रकारांनी छेडले असता मुंगेरीलाल के हसीन सपने असा टोला लगावला आणि सांगितले की दादा भुसे असो की अजून कोणीही असो चुकीचे काम केले तर ते भोगावेच लागते. माझे चुकीचे काम नाहीच तर मला डर का ? असेही भुसे यांनी सांगितले.

 

संजय राऊत हा एक दलाल माणूस आहे तो स्वतःला शिवसेना प्रमुख समजायला लागला त्याला असे वाटते की दलाली करून मीठ शिवसेनेचं खायचं आणि राष्ट्रवादीची दलाली करायची.कधीतरी मला मुख्यमंत्र्यांची लॉटरी लागून जाईल असे राऊत यांना वाटते. माझेवर खोटे आरोप केल्याने त्यांना मालेगावी येऊन माफी मागावी लागणार असेही भुसे यांनी सांगितले.

त्यांनी इतर ठिकाणी नौटंकी दाखवावी मालेगावी चालणार नाही.मी काल पासून तर आज आताच्या क्षणापर्यंत पाचहजार पेक्षा जास्त नागरिकांना भेटलो पोपटपंची करून होत नाही.

१ कोटी ६८ लाख रुपयांचा विषय आहे ते गोळा केलेले पैसे अनुष्ठान कंपनीला आरटीजीएस वर्ग करण्यात आल्याचेही मंत्री भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here