आता प्रत्येक तालुक्यात नव्याने नियुक्त केले तालुका पालक अधिकारी , तुमच्या तालुक्याला कोण ? वाचा…

0
994

( आसिमा मित्तल CEO ZP Nashik वरील छाया चित्रात )                                                                   भारत पवार : मुख्य संपादक  : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल  : आपल्या परिसरातील बातम्या, जाहिराती तसेच नव्याने पत्रकार नियुक्ती  साठी संपर्क : ९१५८४१७१३१.                                      नाशिक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : विलास गडाख : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम,१९६१ नुसार विविध विकास योजना जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येतात. केंद्र व राज्य शासन यांच्याकडून लोकोपयोगी व कल्याणकारी विविध योजना व अभियान राबविण्यात येत असून त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांची प्रत्येक तालुक्यास ‘तालुका पालक अधिकारी’ म्हणून नेमणूक केली आहे.

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (मा. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या स्तरावरील, लोकशाही दिन विभागीय आयुक्त,नाशिक यांच्याकडील विभागीय लोकशाही दिन व जिल्हाधिकारी,नाशिक यांच्याकडील जिल्हास्तरीय लोकशाही दिन,विभागीय व जिल्हा भष्ट्राचार निर्मुलन समिती,मा.लोकायुक्त व उप लोकायुक्त, महाराष्ट्र राज्य, आपले सरकार, PG Portal (CENTRALIZED PUBLIC GRIEVANCE REDRESS AND MONITORING SYSTEM CPGRAMS), महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग,राज्य माहिती आयोग,मंत्री महोदय व शासन यांच्याकडे करण्यात आलेले ग्रामस्यांचे निवेदन अर्ज तक्रारी, तसेच प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे यांचे वेळेत निराकरण करणे आवश्यक आहे.
त्यानुषंगाने तालुका स्तरावर आढावा घेणे आवश्यक आहे. पंचायत समितीस्तरावर मार्गदर्शन, सहकार्य, सहाय्य करणे व नियंत्रण ठेवणे यासाठी प्रत्येक पंचायत समितीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तालुका पालक अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतला जाणार आहे.
असे आहेत तालुका पालक अधिकारी :
नाशिक : प्रतिभा संगमनेरे, प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं. नाशिक
इगतपुरी : दीपक पाटील, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन
त्र्यंबकेश्वर : रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)
पेठ : प्रताप पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि)
सुरगाणा : डॉ. वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)
दिंडोरी : संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता इवद विभाग १
कळवण : डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी
बागलाण : पंकज मेतकर, कार्यकारी अभियंता इवद विभाग २
देवळा : भगवान फुलारी, शिक्षणाधिकारी (योजना)
चांदवड : नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
मालेगाव : कैलास शिरसाठ, कृषि विकास अधिकारी
नांदगाव : शैलजा नलावडे, कार्यकारी अभियंता इवद विभाग ३
येवला : डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
निफाड : योगेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी
सिन्नर : भालचंद्र चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here