महिलांना सक्षम करून अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे प्रशिक्षण देणारी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती : रवींद्र जाधव

0
150

भारत पवार  : मुख्य संपादक.                                   आपल्या परिसरातील बातम्या , जाहिरात साठी तसेच महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे संपर्क करा.मो.९१५८४१७१३१
ताहाराबादबागलाण : (प्रतिनिधी) ताराहाबाद ता.बागलाण येथील शासकीय विश्रामगृह या ठीकाणी अन्याय आत्याच्यार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा नुकताच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रथम राष्ट्रपुरुषांचे प्रतिमेचे प्रमुख मार्गदर्शक पाहुण्यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. प्रास्ताविक उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस संदीप गांगुर्डे यांनी केले. सुत्रासंचालन यशवंत वामन धोंडगे यांनी केले. य प्रसंगी अ.आ.नि.स. बागलाण तालुका कार्यकारीच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पदी मुंगसेगांवचे विजय आहीरे यांची तर महीला प्रभारी तालुकाध्यक्ष नामपुरच्या सौ.लक्ष्मीताई मगजी यांची रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते नियुक्तीपत्र देवुन निवड करण्यात आली. या प्रसंगी विचारपिठावर प्रदीपनाना गांगुर्डे, संजयबाबा गायकवाड, महेंद्रभाऊ साळवे, राजनंदीनी आहीरे, सचिन बागुल, शिलाताई जाधव, प्रदीप पगारे, गौतमभाऊ पठाडे, संगिता पवार, परवीन बागवान, लक्ष्मण गांगुर्डे, संतोष शेजवळ, सोमनाथ गांगुर्डे, निर्मला गायकवाड, फरजाना शेख, वृषाली शेलार, संगिता गायकवाड, रोहीत गायकवाड, शर्मिलाताई गांगुर्डे, रोहीनी वाघ, आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा शाल गुलाबपुष्प देवून उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस संदीप गांगुर्डे, व बागलाण तालुकाध्यक्ष विजय गांगुर्डे यांनी सत्कार केला. या प्रसंगी यशवंत धोंडगे,पंकज पवार यांचेसह नामवंत आदर्श शेतकरी, आदर्श सरपंच, आदर्श ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानाहुन बोलतांना जाधव म्हणाले की अन्याय अत्याचार निर्मुलन समितीत विविध जातीधर्मातील व पक्ष संघटनेतील महीलांना पुरुषांचे बरोबरीचे पद व स्थान देवुन आर्थिक व मानसिक दृष्ट्या सक्षम करुन अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे प्रशिक्षण देवुन समाजातील अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याची प्रेरणा देण्यासाठी समिती कार्यरत असते असे प्रतिपादन रविंद्रदादा जाधव यांनी केले. या प्रसंगी प्रदीपनाना गांगुर्डे, संजयबाबा गायकवाड, राजनंदीनी आहीरे, संगिताताई पवार, वृषाली शेलार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. परवीन बागवान यांनी प्रबोधनात्मक गित गायले. या प्रसंगी बागलाण अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतिने मोफत रुग्णवाहीकेचा लोकार्पण रविंद्रदादा जाधव यांचे करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री अनिल निकम, महेंद्र निकम, भगवान पिंपलासे, हेमंत महाले, पोपट काकुळते, नामदेव महाले, सुनिल पवार, शरद जगताप, जगदीश खरे, रमेश पवार, अंबादास कासारे, पत्रकार संदीप गांगुर्डे, योगेश म्हसदे, अनिल जाधव, अनिल धिवरे, विशाल चव्हाण, संदीप शिरसाट, दिलीप जाधव, प्रशांत भामरे, ज्ञानेश्वर निमोणे, केशव खरपसारे, कडु वणिस, कीरण गांगुर्डे, राजु लोंढे, कीशोर सोनवणे, योगेश जगताप, मयुर आहीरे, अनिल वणिस, बापु पवार, प्रदीप आहीरे, मच्छिंद्र काकळीज, स्वामी थोरात, शुभम चव्हाण, हर्षल शेळके, रोशन जामखेड, बाळा देवरे, प्रकाश आहीरे, धीरज पवार, दिपक गवळी, एकनाथ सोनवणे, गंगाधर पवार, सुनील माळी, वामन शिंदे, भांडुप सोनवणे, पप्पु पवार, लाइफ मन्सुरी, कल्पना जाधव, कविता घरटे, आदींसह बागलाण तालुक्यातील असंख्य पदाधीकारी उपस्थित होते. शेवटी आभार तालुकाध्यक्ष विजय आहीरे यांनी मानले व राष्ट्रगीत व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here