नाशिक पदवीधर मतदार संघातील कांटे की टक्कर मधून किशोर दराडे तर मुंबईत ठाकरे गटाचा डंका

0
12
Oplus_131072

भारतराज पवार :राज्य मुख्यसंपादक :                       पत्रकार नियुक्ती साठी तसेच बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : ९१५८४१७१३१                   मुंबई / नाशिक  : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : राज्यात चार जागांवर विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात निवडणूक प्रक्रिया पार पडली.यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदार संघात बाजी मारत विजयाची गुडी उभारली.तर कोकण पदवीधर मतदार संघात भाजपने आपले स्थान कायम राखले.

उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे अनिल परब यांनी विजयाचा डंका पिटला तर मुंबई शिक्षक मतदार संघात सुद्धा ठाकरे गटाच्या शिवसेनेचा जगन्नाथ अभ्यंकर यांनी आघाडी घेतली.तर कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे निरंजन डावखरे हे विजयी झाले.

नाशिक शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या किशोर दराडे यांनी काटे की टक्कर मध्ये जोरदार विजय पटकावला.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत दराडे , महायुतीचे संदीप गुळवे आणि अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात काटे की टक्कर होती.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांचे लक्ष नाशिक शिक्षक मतदार संघाकडे लागून होते.अखेर दराडे यांनी बाजी मारत गुलाल उधळला.

गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मतमोजणी मध्ये किशोर दराडे पहिल्या दोन्ही फेऱ्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर होते.तर अपक्ष कोल्हे हे दुसऱ्या स्थानी राहिले.

या निवडणुकीत विजयासाठी ३१५७६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.मात्र कोणत्याच उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या क्रमांकाचा मताचा कोटा पूर्ण केला नसल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली.

Oplus_131072

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here