आयुक्त भालचंद्र गोसावी रागाच्या भरात महापालिकेतून गायप ? हरविल्याची तक्रार दाखल

0
1049

भारत पवार  : मुख्य संपादक :                         आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो.९१५८४१७१३१                              मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव म्हंटले की या ना त्या कारणाने सतत गाजत असते म्हणूनच या महानगरकडे अतिसंवेदनशील शहर म्हणून पाहिले जाते म्हणूनच या महानगरास उच्च पदस्थ जबाबदार अधिकारी सुद्धा तेवढेच संवेदनशील असतात.मग येथील अप्पर जिल्हाधिकारी असो की अप्पर पोलीस अधीक्षक असोत की महापालिका आयुक्त असोत की तहसीलदार ह्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्ष आणि अति संवेदनशीलते मुळे मालेगाव महानगर विकासाची आणि सुरक्षितेची काथ टाकत आहे.म्हणूनच निर्भय पणाने येथील नागरिक पाऊले टाकत आहेत. परंतु जनविकास कामांना , मालेगावच्या स्वच्छतेला वाऱ्यावर सोडून त्यास गालबोट लागावे म्हणून की काय ? येथील महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी बेजबाबदार असे झाले की काय अशी  संतप्त प्रतिक्रिया नागरिकात व्यक्त केली जात आहे.याबाबत मालेगाव शहरातील सुज्ञ नागरिकांना आयुक्त तथा मालेगावचे सद्या असलेले प्रशासक यांचे बाबतीत अनुभव आल्याने मालेगाव महापालिका वाऱ्यावर की कोणाच्या बेभान भरवश्यावर आहे ?आहे याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज च्या हाती आलेल्या वृत्तानुसार महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी हे मागील काही दिवसांपासून कार्यालयात दिसेनासे झाले असून त्यांच्या कार्यालयातील गैरहजेरी बद्दल म न पा अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी देखील आम्हालाच माहीत नाही त्याच्या अचानकपणे जाण्याचे कारण समजू शकले नाही व ते रागाच्या भरात कुठेतरी निर्जन स्थळी निघून गेलेत की काय म्हणून काही शहरातील जागरूक नागरिकांनी शोध घेतला असता त्यांची देखील निराशा झाली म्हणून हताश होऊन काल दि 23/11/2023 रोजी अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांना वरील विषयांवर सविस्तरपणे माहिती देण्यात आली असून मालेगाव महानगरपालिका आयुक्त हरविले बाबत लेखी तक्रार देण्यात आली आहे त्याच प्रमाणे लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊन आम्हाला आमचे आयुक्त शोधून द्यावे असे साकडे देखील घालण्यात आले त्यावर पोलीस अधीक्षक यांनी आमच्या विनंतीचा मान राखून शोध घेण्याचे आश्वासन दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here