नवीमुंबई : मनसे आक्रमक काही मुजोर दुकानदारांच्या विरुद्ध केले ठिय्या आंदोलन

0
62

भारत पवार : मुख्य संपादक.                                   आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी संपर्क महाराष्ट्रात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे.संपर्क : मो.९१५८४१७१३१

नवी मुंबई : महाराष्ट्र न्यूज  वेब चॅनल : प्रतिनिधी : सीवूड्स नेक्सस ग्रँड सेंट्रल मॉल मध्ये मराठी पाट्यांसाठी मनसेने जोरदार आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली दोन महिन्यांची मुदत २५ नोव्हेंबर ला संपुष्टात आली तरी मुजोर मॉल प्रशासनाने आणि मॉल मधील आंतरराष्ट्रीय ब्रँड च्या काही दुकानदारांनी अद्याप पाट्या मराठीत केल्या नाहीत. याविरुद्ध “दुकानांवरील पाट्या मराठीत झाल्याच पाहिजेत”, “मराठीचा मान राखलाच पाहिजे” अशा जोरदार घोषणा देवून मनसे कार्यकर्त्यांनी मॉल परिसर दणाणून सोडला. तसेच मॉल प्रशासना विरुद्ध आक्रमक पवित्रा घेत मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.

“दुकानांवरील इंग्रजी पाट्या जो पर्यंत खाली उतरवत नाहीत तो पर्यंत मॉल मधून एकही मनसे कार्यकर्ता बाहेर जाणार नाही” असा आक्रमक पवित्रा मनसे शहर सचिव सचिन कदम यांनी घेतला. तसेच “येत्या काही दिवसात मॉल मधील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत झाल्या नाहीत तर मनसेच्या झेंड्याला दांडा सुद्धा आहे हे मॉल प्रशासनाने लक्षात ठेवावे” असा सज्जड इशारा मनसे उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी दिला. मनसेचा आक्रमक पवित्रा पाहून मॉल प्रशासनाने इंग्रजी पाट्या तात्काळ हटवायला सुरुवात केली. तसेच येत्या सात दिवसात मॉल मधील दुकानांवरील सर्व पाट्या मराठीत करू असे आश्वासन मॉल चे महाव्यवस्थापक अविनाश दुबे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले. मनसेच्या या आंदोलनात उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, विभाग अध्यक्ष निलेश जाधव, अमोल आयवळे, उमेश गायकवाड, अक्षय भोसले, उप विभागअध्यक्ष नरहरी कुंभार, राजेंद्र खाडे, विनोद लांडगे, शाखा अध्यक्ष प्रमोद डेरे, संदीप कांबळे, आतिष पाटील, प्रणित डोंगरे, रोहित शिवतरे, गणेश पाटील, मयूर कारंडे, जनहित कक्ष शहर सचिव मंगेश काळेबाग व मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here