विजय पगार यांची चांदवड देवळा विधानसभा अध्यक्ष पदी निवड

0
399

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज              आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१                         देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी _ नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील मविप्र संचालक विजय पगार यांची चांदवड देवळा विधानसभा अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आल्याने त्यांचे जिल्हास्तरातून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

 

महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या हाती आलेल्या वृत्तानुसार मविप्र संचालक विजय पगार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या ) या पक्षाच्या चांदवड देवळा विधानसभा अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आल्याचे नियुक्तीचे पत्र पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी दिले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार हि नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

मविप्रच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत आणि महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या निवडणुकीत विजय पगार यांनी चांगलीच बाजी मारून यश संपादन केलेल्या पगार यांच्या मुळे देवळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास मोठे बळ मिळाल्याने पगार यांच्या वर देवळा चांदवड विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या प्रसंगी महारष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक भारत पवार यांनी विजय पगार यांचे अभिनंदन केले असून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.तर सध्या देवळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेली मरगळ दूर होईल अशी अपेक्षा ही पवार यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

यावेळी पगार यांच्या समवेत जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.देवळा तालुका अध्यक्ष पंडितराव निकम , प्रा.डॉ.सतीश ठाकरे , श्री. सूर्यवंशी यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here