
समीर वानखेडे ( छाया चित्र ). भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि बातम्यां साठी संपर्क : मो. ९१५८४१७१३१ मुंबई : समीर वानखेडे प्रकरणाच्या निमित्ताने………………….! अनुसूचित जाती, जमाती अन इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वच प्रकारच्या आरक्षणावर डल्ला मारणारी एक जमात या देशात निर्माण झाली आहे. पण त्यावर चर्चाच होत नव्हती. समीर वानखेडे प्रकरणामुळे सुरू झालीय. समीर व त्याच्या वडिलांनी अपराध केले नसते, तर ही चर्चा सुरू झाली नसती.या अपराधाबद्दल वानखेडे कुटुंबाचे आभार ! अन ही चर्चा ज्यांच्यामुळे सुरू झाली, ते नवाब मलिक यांचे ही मनापासून आभार ! तसेच या डल्ला मारणाऱ्या जमातीला पाठींबा देणाऱ्या सर्वांचा जाहीर निषेध ! *कुणी किती ही महापंडित बनण्याचा प्रयत्न केला तरी समीर वानखेडे हा जन्माने मुस्लिम आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. कारण इथल्या एक शासकीय यंत्रणेने त्याला हा दाखला दिला आहे. जन्म दाखल्यावरूनच जातीचा दाखला मिळण्याची सोय व व्यवस्था आपल्या देशात असून तिला दुसरा कुठला ही पर्याय नाही.कुणाला आपल्या वडिलांचा धर्म नको, असेल तर ती व्यक्ती 18 वर्षांनंतर आपला धर्म बदलू शकते. पण त्याचे प्रमाणपत्र नाही. समीर वानखेडे यांनी हे बदलून दाखविण्याचा पराक्रम केला आहे. यालाच डल्ला मारणे असे म्हणतात. * रामदेव बाबाची भक्त असणाऱ्या नवनीत कौर राणा, केजमधील मुंदडा परिवार अन सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर व सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करणाऱ्या जयसिद्धेशवर स्वामी या भाजप खासदारांनी असाच डल्ला मारलेला आहे. त्यामुळे आपल्याला ठरवावे लागेल कुठल्या बाजूला उभे राहायचे ते .
लेखन : शोध पत्रकारितेचा बादशहा – लोकनायक : संजय बोर्डे
