
निवडणूक निशाणी _ टी.व्ही /दूरदर्शन माळवाडी : माझ्या सासरच्या सर्व सासू , सासरे , दिर आणि दीरानी विशेषतः माझे हक्काचे मतदार दाते मी आपणास माझ्या हृदयापासून वंदन करते. परमेश्वराने मला स्री रूपात जन्मास घातले हे माझे खरोख भाग्य समजते. कारण नुसते जन्मास येऊन उपयोग नसतो तर जन्माबरोबर चांगले नशीब पण लागते.नशीबाची साथ राहिली तर सर्वकाही चांगलेच घडते.म्हणजे त्या महिलेचा जन्म सत्कारणी लागतो असे मला वाटते.त्याचप्रमाणे माझा जन्म सत्कारणी तर लागलाच परंतु माझे भाग्य पण उजळले. ते असे महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले , महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज आणि महान संत रोहिदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या माळवाडी गावातील तमाम मतदारदातांच्या अर्थात मतदार राजांच्या गावची सून झाली. विशेषतः हि संधी वॉर्ड क्रमांक ३ ( तीन) मधील सर्व मतदार राजांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले त्यामुळे मी खूपच भाग्यवान समजते. आता वॉर्ड क्रमांक तीन मधील मतदारांनी सेवा करण्याची संधी मला तुम्ही तुमचे बहुमूल्य मत माझी निशाणी असलेल्या टीव्ही / दूरदर्शन चे नंबर दोन चे बटन दाबून मला ग्रामपंचायतीत प्रचंड मतांनी निवडून देऊन आपल्या वॉर्ड क्रमांक तीन मधील आजही अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी संधी द्या.
आज पर्यंत वॉर्ड क्रमांक तीन मधून अनेक वर्ष तुम्हीच निवडून देऊन ग्रामपंचायतीत ठान मांडून बसलेल्यानी वॉर्ड चा विकास केलाच नाही.आजही अनेक समस्या आहेत त्या समस्या काय आहेत हे मी तुम्हास सांगणार आहे ते पटवून देणार आहे. परंतु आज नाही .त्या समस्या सोडविण्यासाठी मला तुम्ही भरभरून माझ्या टीव्ही निशाणी समोरील नंबर दोन चे बटन दाबून मतदान करून निवडून आणून द्द्या मग वॉर्ड तीनचा विकास बघा कसा होत नाही. मी तुम्हाला शब्द देते यावेळी मला निवडून दिल्यास पाच वर्षात मी किती आणि कोणती विकास कामे करणार, आपल्या वॉर्ड तीन चा चेहरा मोहरा नाही बदललेला दिसला तर पुन्हा मी माळवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार नाही हा माझा शब्द आहे. आपण सुज्ञ आहात आजपावेतो तुमचा काय विकास झाला ? तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा. एकाच भाऊबंदकित किती वेळा सत्ता दिली , भाऊबंदकीलाच किती वेळा निवडून दिले त्यांनी तुम्हास काय दिले ? हा विचार तुम्हीच करा. कधीतरी दुसऱ्या उमेदवारास निवडून आणा आणि त्याचे विकास कामे बघा की तो काय करतो की नाही ? हे आजमावून पाहू शकता तुम्ही.आणि ही संधी आहे आजमावून पाहण्यासाठी त्या संधीचे सोने करा आणि आपल्या वॉर्ड तीन मध्ये सोन्या सारखे विकास कामे करण्या साठी हातभार लावा.
मी जरी नव्याने उमेदवारी करत असेल पण माझ्या पाठीशी असलेले माझे सासरे भारत पवार यांचे पत्रकार म्हणून आज अनेक ठिकाणी त्यांना मानणारे अधिकारी वर्ग आणि मग जिल्हा परिषद असो , जिल्हाधिकारी कार्यालय असो की मंत्रालय असो ह्या कार्यालयातून सासरे पत्रकार भारत पवार यांच्या सहकार्याने मी आपल्या वॉर्ड तीन मध्ये अनेक विकास कामे आणून करून दाखविणार .तसेच माझे पती प्रमोद पवार हे सुद्धा सासरे भारत पवार यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक सरकारी कार्यालयात आपल्या मतदारांची त्यांनी कामे केली आहेत.येवढेच काय रात्री ११ वाजता मला झोपेतून उठवून सख्या चुलत्याने पुतण्यावर केलेली पोलीस केस मी सोडवली आहे पण त्याच्यावर अन्याय होऊ दिलेला नाही.असेही प्रमोद पवार यांनी यावेळी सांगितले.अशा अनेक प्रकारे मी प्रत्येक व्यक्तीच्या कामात ,प्रत्येक मतदाराच्या कामी मी आलोय असेही प्रमोद पवार यांनी यावेळी सांगितले.सांगायचं उद्देश असा की शासकीय कार्यालयात ओळखी असल्या कारणाने आपण विकासाची गंगा वॉर्ड तीन मध्ये आणणार.हे नक्की.
म्हणून माझ्या आई वडील ,भाऊ ,बहीण समान असलेले मतदार राजांनी मला समजून घेऊन तुमच्या सुनेला म्हणजेच सुरेखा प्रमोदकुमार पवार हिला पदरी तर घेतले आहेच पण विकास काम करण्याची संधी देण्यासाठी तिची निशाणी असलेल्या टीव्ही (दूरदर्शन ) चित्रा समोरील नंबर दोन चे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावी असे आवाहन प्रमोद पवार यांनी यावेळी केले.
तर माझा जन्मच सासरच्या मतदार राजांच्या समस्या सोडविण्यासाठी झाला असून मला क्रांतीसूर्य म.जोतिबा फुले, दैवत शिवाजी महाराज आणि महान संत रोहिदासजी महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या गावातील मतदार संघातील वॉर्ड तीन चे मतदारराजा अर्थात माझे सासू, सासरे,दिर , नणंद यांची सेवा करण्याची संधी मिळाली ती संधी मला माझ्या टीव्ही (दूरदर्शन) निशाणी समोरील नंबर दोन चे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावी म्हणजे मी आपणास दिलेला शब्द खरा करून दाखवीन.की गेल्या २५ – ३० वर्षांपासून आपल्या समस्या कोणी सोडविल्या नाहीत त्या समस्या सोडविण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार . आणि समस्या सोडविणार म्हणून मला वॉर्ड तीन मधील मतदारांनी आपले बहुमूल्य मत टीव्ही (दूरदर्शन ) ह्या निशाणीचे बटन दाबून ” मतदान” करून मला विकास कामे करण्यासाठी आशीर्वाद द्यावा असे आवाहन सौ.सुरेखा प्रमोदकुमार पवार यांनी केले .
