फुलेमाळवाडीत काटे की टक्कर

0
170

देवळा / माळवाडी : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील फुले माळवाडी ग्रामपंचायतीचे निवडणूक वातावरण जोरात तयार होत असून जस जसा मतदान करण्याचा दिवस जवळ येत असून तस तसे उमेदवारांची प्रचाराच्या फेरी जोमाने फिरत आहेत.

एकूण नऊ सदस्य जागा असलेल्या फुले माळवाडी ग्रामपंचायतीचे लंकेश बागुल यांच्या नेतृत्वाखाली असलेले लोकमान्य ग्रामविकास पॅनलचे  आठ जागा बिनविरोध निवडून आल्याने जनतेने बागुल यांचे नेतृत्व मान्य केल्याचे दिसत असले तरी थेट सरपंच पदाचे उमेदवार असलेले लंकेश सीताराम बागुल यांचे वर्चस्व सिद्ध होणार ? अशी चर्चा जनतेत आहे. लंकेश बागुल यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या लोकमान्य ग्रामविकास पॅनलने आठ जागा बिनविरोध पटकवल्या असल्या तरी उर्वरित एक सदस्य जागे साठी आणि थेट सरपंच पदा साठी मात्र काटे की टक्कर होत असून हा सामना अधिकच जोरदार होणार अशी ही चर्चा येथे होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here