बिनविरोध निवड धुळीस चारली माळवाडीत दुरंगी लढत,विरोधकांकडून धमक्या

0
796

भारत पवार : मुख्य संपादक                                    देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी, फुले माळवाडी आणि मेशी गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने गावात निवडणूकमय दसरा सण साजरा केला जाणार असल्याची दाट शक्यता आहे.मात्र माळवाडी गावातील स्व घोषित केलेली बिनविरोध निवडणूक जनतेने आणि अनेक तरुणांनी हाणून पाडल्याने विरोधक उमेदवारांमध्ये मोठे पोटात दुखणे झाले आहे.त्यामुळे काही पंचर उमेदवारांकडून मांड्या ठोकणे, शिवीगाळ करणे, धमक्या देणे आदी शक्तीचा वापर केला जात आहे.याबाबत लवकरच पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेणार असल्याचे सुज्ञ उमेदवारांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.

गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र न्यूज ह्या वेब चॅनल मधून माळवाडी गावात अवतरली दंडेलशाही , गरीबांना वाली नाही ह्या मथळ्या खाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.त्या वृत्ताची दखल माळवाडी गावातील समस्त नागरिकांनी व तरुणांनी घेतली.त्यामुळे विरोधकांची पायाखालची जमीन मात्र सरकली विरोधकांनी गावातील कोणत्याही सुज्ञ नागरिकांना न सांगता ,नगरीकास विश्वासात न घेता कुठेतरी कोपऱ्यातील एक हॉटेल निवडून स्व घोषित बिनविरोध निवड करण्याचे निश्चित करून आपल्या मर्जीतील उमेदवार निवडून टाकून औपचारिकता म्हणून फक्त उमेदवारी अर्ज दाखल करून माघारीच्या दिवशी जाहीर करू की बिनविरोध निवड पार पडली.परंतु हे वृत्त महाराष्ट्र न्यूज च्या हाती पडताच मुख्य संपादक भारत पवार यांनी याबाबत आवाज उठून वृत्त प्रसिद्ध केले.त्यामुळे जनतेत जागृती झाली आपल्या कोणासही न सांगता आणि माळवाडी गावातील सभागृहात मीटिंग न घेता कुठेतरी ओली पार्टी झोडत उमेदवार जाहीर करणे म्हणजे मतदारांचा , जनतेचा विश्वासघात करणे असेच झाले होते.त्यामुळे जनतेत सर्वत्र नाराजी पसरली असून विरोधकांना त्यांची अवकात काय आहे ? हे दाखवल्या शिवाय मतदारांची नाराजी दूर होणार नाही असे सर्वत्र बोलले जात आहे.

त्यामुळे विरोधकांकडून दबाव तंत्र ,शिवीगाळ ,धमक्या जनतेच्या विश्वासातील असलेले उमेदवार संतोष बाळू जाधव ,सुरेश तुळशीराम  बागुल , दावल शेवाळे यांच्या पत्नी , सुरेखा प्रमोदकुमार पवार , महाध्या बागुल यांच्यां आई कल्पना बागुल यांना दिले जात आहेत .परंतु जनता ,मतदार आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही विरोधनांकडे लक्ष देत नसून आचार संहितेचा भंग व पुढील काळात वातावरण दूषित होऊनये म्हणून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन याबाबत सविस्तर माहिती त्यांना सांगणार असल्याचे उमेदवारांचे नेत्यांनी यावेळी सांगितले.

या निवडणुकी कडे संपूर्ण देवळा तालुक्याचे लक्ष लागले असून वार्ड क्रमांक तीन मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असलेली परंपरा मोडीत काढण्या साठी मतदार सरसावले आहेत तर गेल्या १५ वर्षांपासून प्रमोद पवार यांच्या घरी बसून राजकारणाचे डाव खेळणारे आणि त्यांच्याच साठी उघड विरोध करणारे प्रमोद पवार व पवार कुटुंबांना डावलून स्वतःचा उलु सिधा करण्या साठी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हेमंत बागुल याने थुंकू चाटण्याचा प्रकार केल्याने जनमानसात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून अशा गद्दारांना धडा शिकविल्या शिवाय व चालत आलेली घराणे शाही मोडीत काढण्या साठी आता दुसरा पर्याय नाही नाही.अशी चर्चा सर्वत्र होत आहे .स्वार्थ साधण्यासाठी गद्दारी करणे हे माळी समाजास कलंक असून हा कलंक पुसून टाकायचा असेल तर माळी समाजाने आता सावध होऊन संतोष जाधव ,सुरेश बागुल , दावल शेवाळे यांच्या पत्नी आणि सुरेखा प्रमोद पवार , कल्पना बागुल  यांना निवडून देऊन गाव विकासाला चालना द्यावी असे आवाहन मुख्य संपादक व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार जिल्हा कार्याध्यक्ष भारत पवार ,राजेंद्र रमण बागुल , गंगाधर दोधा शेवाळे, नितीन उर्फ फन्टर शेवाळे ,दादाजी तानाजी शेवाळे,  यांनी केले आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here