
भारत पवार : मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१
देवळा / माळवाडी : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी,फुले माळवाडी आणि मेशी गावातील ग्रामपंचायत निवडणूक घोषित झाल्या आणि अनेक दिवसांपासून उतावीळ गुडघ्यास बाशिंग बांधून सज्ज झाले आहेत परंतु तालुक्यातील माळवाडी गावी गरीबांना वालीच नाही हे गावातील( ना) लायक राजकारण होत असल्याचे समजले . बिनविरोध उमेदवार निवडून आणणे हे जरी शहाणपणाचे लक्षण असते त्या शहाणपणास योग्य असेच राजकारण केले गेले पाहिजे.राजकारण म्हणजे स्वार्था साठी खुर्ची मिळविणे नको त्यास बिविरोध काढणे हे कशाचे लक्षण म्हणावे लागेल ? यात शहाणपणा आहे काय ? राजकारण म्हणजे घराणेशाही मळवडीत चालली असेच आजच्या बिनविरोध निवडी वरून हुकूमशाही वाल्यांनी चालविली असल्याचे खात्रीशीर कळतेय.यात असे समजते की, नवा मळ्यातील सूत्रधारांकडून पाच उमेदवार व सरपंच बिनविरोध तर फुले माळवाडी मळ्यातील ( फुले माळवाडी नाही ) पाण्याच्या टाकी जवळून सूत्र हालत आहेत तेथून चार उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचे फार्मूला तयार झाल्याचे कळते. यासाठी माळवाडी गावात सभागृहात बैठक घेऊन सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करून मीटिंग घेऊन नवीन चाणाक्ष , हुशार गावास न्याय देणारे नवीन उमेदवार बिनविरोध काढणे गरजेचे आहे त्यालाच खरे लायकी चे राजकारण म्हंटले जाते.आज रोजी जे बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याचे संकेत आहेत त्यात अनेक उमेदवार घराणे शाहीचे घेतल्याचा कुटील डाव केला आहे.हे मात्र गावकऱ्यांसाठी लायकीचे राजकारण नाही.ही हुकूमशाही झाली.या साठी गावातील मतदारांनी सावध व्हा आणि जागृत अवस्थेत या.आणि कुटील राजकारणाचा डाव वेळीच हाणून पाडा.जर बिनविरोध उमेदवार निवडून आणायचे असतील तर खरच शहाणे असाल,लायक असाल तर घराणेशाही मोडीत काढून इच्छुक आणि होतकरू उमेदवारांना जवळ करा.आणि निवडून आणा.नाहीतर लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊ द्या.यातच खरे शहाणपण आहे.
अनेक तरुण उमेदवार असे आहेत की त्यांना गाव विकास कामे करण्यात नेमकी कोणाची पायरी चढावी लागते हे सुद्धा कळत नाही अशांना बिनविरोध निवडून आणणे हे किती लायक पणाचे डोके चालविले आहे हेच कळत नाही. गावातील नवीन तरुणांना ,विकास काम करणाऱ्यांना च संधी द्या.आजचे बिनविरोध असलेले उमेदवार उद्या गाव भकास केल्या शिवाय राहणार नाहीत हे त्या उमेदवारांच्या अभ्यासावरून दिसते.
उमेदवारी अर्ज भरण्यास आज पासून सुरुवात होत असल्याने बिनविरोधचा गुप्त गु घराणेशाही असलेला फार्मूला काल, परवा पासून खिचडी सारखा मळ्यात – खळ्यात शिकतोय यात अनेक जाणकारांना विश्वासात घेतले नाही त्यामुळे हा बिविरोधाचा फॉर्म्युला भविष्यात जनतेस ,गावातील विकासकामांना अडचणीत आणणारा ठरेल यात शंकाच नाही. माळवाडी गावातील दंडेलशाही हाणून पडायची आणि गरीबांना वालीच आणायचा म्हणून ….
गावकऱ्यांनी सावध व्हा,जागे व्हा…. एवढेच…!
