चांद्रयान -३ ठरतेय गणेश भक्तांना लक्षवेधी पाहणाऱ्यांची झुंबड

0
101

भारत पवार : मुख्य संपादक

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा. तसेच आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१

 

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : अनिकेत मशिदकर – |महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मंगळवारी दिनांक १९ रोजी घरोघरी तसेच सार्वजनिक मित्रमंडळांमध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यंदा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी देखील (आरास ) नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत. मालेगावच्या मंगलमूर्ती गणेश परिवार मंडळातर्फे चंद्रयान – ३ ची आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे. चंद्रयान- ३ ची आरास बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असून नागरिकांनी या सजावटीचे भरभरुन कौतूक केले आहे. या चंद्रयान – ३ सजावटीसाठी मधुरा जोशी, मनीषा जाधव, अंजली जाधव, अमृता

जोशी, प्रतीक्षा पवार, मयूरी पवार, सेजल बोरसे, माधुरी त्रिभुवन, संगीता जाधव, हर्षिता मोरे, वैशाली बोरसे, सरिता कापडणीस, हर्षिता जाधव, माया पवार आदींनी मेहनत

घेतली आहे. त्यांना गणेश मंडळाचे सदस्य अँड किशोर त्रिभुवन, योगेश मोरे, अशोक जाधव, योगेश जोशी, योगेश जाधव, शांतीलाल पवार,आदींनी सहकार्य केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here