आर.पी.आय.पक्षाचे राज्यभर विभागनिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन : केंद्रियराज्यमंत्री रामदासजी आठवले
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा. संपर्क : ९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : संजय बोर्डे यांज कडून :
रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर विभागनिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून येत्या सोमवार दि. २१ ऑगस्ट रोजी मुंबई प्रदेश चे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.मुंबई प्रदेशच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरापासून राज्यभर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांचा प्रारंभ होणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदासजी आठवले यांनी दिली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर विभागनिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात
पाहिले शिबीर दि.२१ ऑगस्ट मुंबई तर दुसरे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर विदर्भ विभागाचे यवतमाळ येथे होत आहे. तर दि. २७ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्र विभागाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे तर दि.२८ ऑगस्ट रोजी ठाणे प्रदेश चे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर भिवंडी येथे आयोजित करण्यात आले आहे.तसेच मराठवाडा विभागाचे प्रशिक्षण शिबीर दि.३०ऑगस्ट रोजी जालना येथे आयोजित करण्यात आले आहे. दि.३१ ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्र विभागाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.तसेच कोकण विभागाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर चिपळूण येथे दि. ३सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.तसेच दि.४ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर बोईसर येथे आयोजित करण्यात आले आहे. या सर्व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला ना.रामदासजी आठवले मार्गदर्शन करणार आहेत.