प्रसिध्द विचारवंत प्रा.हरी नरके यांचे निधन
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा…संपर्क : ९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जेष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा.डॉ.हरी नरके यांचे आज पहाटे वयाच्या ६० व्या वर्षी दुःखद निधन झाले. मुंबईतील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले जाते असे समजते .नरके गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. म्हणून त्यांना खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.पुणे विद्यापीठात महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते.तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यही होते. प्रा.हरी नरके यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र शासनाने दुःख व्यक्त केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक गमावल्याने हळहळ व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली तर अशा विचारवंताच्या जाण्याने महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली ही पोकळी कधीच भरून निघणार आहे असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगून श्रद्धांजली अर्पण केली.