भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क : मो.9158417141
मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर : मुंबई महानगर पालिकेच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ऋतुजा लटके प्रचंड मतांनी विजयी झाल्याने अंधेरीत उद्धव ठाकरे शिवसेनेची मशाल भडकली आणि भगवा फडकल्याने मुंबई मध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांनी जोरदार फटाके वाजवून दिवाळी साजरी केली तर मालेगाव आणि धुळ्यात विजयी शिवसैनिकांचा जल्लोष.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लटके यांच्या विजया निमित्ताने बोलताना सांगितले की ,भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने लटके यांचा विजय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे शिंदे यांनी सारवा सारवा केली असल्याची चर्चा अंधेरीत बोलले जात होते.धुळे- अंधेरी विधान सभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी दि.3 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते, भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांनी ऐनवेळेस घेतलेली माघार व शिंदे गटाने या जागेवरचा दावा सोडल्याने तसेच शिवसेना पक्षाला न्यायालयीन लढाई मुळे धनुष्यबाणा ऐवजी निवडणूक चिन्ह म्हणून मिळालेल्या मशाल या चिन्हावर ही निवडणूक पार पाङली, अत्यंत कमी फक्त 31 % मतदान या निवडणूकीत मतदारांनी केले तसेच या पोटनिवडणुकीत भाजपा द्वारे करण्यात आलेला चुकीचा प्रचार या पार्श्वभूमीवर ऋतुजा लटके या 66247 मतांनी आघाङी भेटुन विजयी झाल्या, या विजया मुळे महाराष्ट्रातील शिवसैनिकांमधे उत्साह निर्माण झाला असुन शिवसेना धुळे महानगर वतीने या विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला, या प्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगर प्रमुख धीरज पाटील, समन्वयक भरत मोरे, उपमहानगरप्रमुख संदिप सुर्यवंशी, सुनिल चौधरी, प्रविण साळवे, सुभाष मराठे, मुन्नाभाई पठाण, योगेश चौधरी, रामदास जगताप, हिमांशु परदेशी, महादु गवळी, प्रकाश शिंदे,अजय चौधरी, प्रमोद चौधरी, नितीन जङे, नितीन देशमुख, नंदु उचाळे ,राजु ढवळे, पिंटुभाऊ चौधरी, पिनुभाऊ सुर्यवंशी, शुभम रणधीर, मनोज गवळी,छोटुभाऊ माळी,लक्ष्मण बोरसे, अनिल शिरसाठ, तेजस सपकाळ, योगेश चौगुले,रविंद्र माळी, आबा हरळ, कैलास मराठे, मनोज शिंदे हेमंत साळुंखे ,योगेश गवळी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.




