भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा .मो.9158417131
मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव नियोजित जिल्ह्याचे गाव असून गेल्या अनेक वर्षांपासून मालेगाव जिल्ह्याचे गाजर शासनाने लोंबकळत ठेवले असून त्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दस्तर खुद्द मालेगावचे असूनही जिल्ह्याचा चकार शब्दही नाही ते तर सोडाच परंतु मालेगावच्या अधिकाऱ्यांमध्ये मंत्री महोदयांचे नावाचा दबाव मात्र ह्या अधिकाऱ्यांमध्ये दिसत नसल्याचे त्यांच्या कामगिरी वरून आणि नागरिकांच्या भावनांच्या उद्रेका वरून दिसते.येथील अप्पर जिल्हाधिकारी फक्त मंगळवारी आणि गुरुवारी मालेगावी उपलब्ध असतात इतर दिवशी नागरिकांच्या कामकाजाचे ठणठण असते तर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार सुद्धा नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ. देत नसतात माहिती अधिकार अर्ज इतर अन्य कामांचे नागरिकांचे अर्ज तहसीलदार महशयांच्या टेबलावर धूळ खात पडून असून सर्व सामान्य माणूस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आपले कामाचे निवारण करण्यासाठी आतुरतेने त्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत असतात मात्र अधिकाऱ्यांनी आापल्या जबाबदारीचे भान कुठे ठेवले हेच कळेनासे झाले असून भेटणाऱ्या नागरिकांना हे अधिकारी वेळच देत नसल्यामुळे नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून जर वरील अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या कार्यालयाची मालेगावात गरज नसेल तर हि कार्यालये बंद करावीत आणि जनतेच्या भावनांशी खेळणे बंद करावे अशी संतप्त प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते रामदास कारभारी बच्छाव , छावा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष जिवन हिरे , विठोबा ग्यानदान आदींनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना व्यक्त केली. नागरिकांना सारख्या चकरा माराव्या लागत असून अधिकारी भेटत नसतात जर कार्यालयात अधिकारी असेल तरी त्यांच्या मर्जीचा राज असतो.वेळ देत नाहीत नागरिकांचे काम लांबणीवर पडत असून अधिकाऱ्यांच्या ह्या सावळा गोंधळ मुळे चकरा मारत असलेल्या नागरिकांना येतेय भोवळ असेही वरील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.




