भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : पत्रकार नियुक्ती साठी तसेच आपल्या जाहिराती आणि परिसरातील बातम्या साठी संपर्क संपर्क करा. – मो.9158417131 मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : भारत पवार / राजेंद्र पाटील राऊत – पंचायत समिती मधून ” स्पेशल रिपोर्ट : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून तेथील कारभारी अर्थात गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांचा कारभार लई भारी की कर्तव्यात कसूर ठरी अशी म्हणण्याची वेळ त्यांच्या कासव गती च्या कामगिरी वरून दिसते. येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे कोणताही व्यक्तीस शब्द देतात…पण तो शब्द पाळण्याची गॅरंटी नसते.हे तितकेच खरे मग त्यांचा शब्द त्यांचे कर्मचारी पाळण्यास टाळाटाळ करतात की त्यांचा कर्मचाऱ्यांवर वचकच नाही की हेच कळेनासे झाले त्यामुळे पंचायत समिती आणि तेथील गटविकास अधिकाऱ्यांसह कर्मचारी चव्हाट्यावर आले आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या जबाबदार पत्रकारावर चक्क आत्मदहन करण्याची वेळ यांच्या असल्या बेजबाबदार ,संथ गतीने चालणाऱ्या कारभारामुळे यावी हि किती लांछनास्पद आणि लाचार गोष्ट म्हटली पाहिजे. आत्मदहन करणे हे वेगळे आणि न्याय मागणी असूनही ती पूर्ण करण्या साठी संबंधित अधिकारी टाळाटाळ करतो म्हणून आत्मदहन करायला लावणे हे वेगळे. आत्मदहनातील हा मोठा फरक असतो.हा फरक आमचे पोलीस समजून घेतील तर ना ! अनेकांच्या कोणत्याही प्रश्नांना वाचा फोडून न्याय देणारा पत्रकार आणि त्यांचेवरच पोलीस कारवाईचे धाडस करून प्रेम दाखवतात हे किती भयानक कृत्य म्हंटले पाहिजे.मग हिटलर शाही नाहीतर काय म्हणावे ? गेल्या दोन वर्षांपासून न्याय मागणी साठी पत्रकार / संपादक राजेंद्र राऊत पाटील हे झुंज देत आहेत.मालेगाव तालुक्यात वऱ्हाणे येथील ग्रामसेविका साळुंखे यांची गटविकास अधिकारी यांनी कर्मचारी नियुक्त करून खातेनिहाय चौकशी केली असता त्या दोषी असल्याचे खुद्द गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी जाहीर करून सुद्धा त्यांचे वर कारवाईचे धाडस न दाखवता दोन वर्षांपासून फक्त आश्वासनाची खैरात वाटून त्यांना अभय देत राहिले.यासाठी पाठपुरावा केला शेवटी आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आणि बसलो सुद्धा त्यावेळी माझ्या मागण्या बाबत सकारात्मक लेखी आश्वासन दिले,शब्द दिला परंतु शब्द पाळण्याची गॅरंटी दिसली नाही म्हणून गटविकास अधिकारी यांच्या टाळाटाळ भूमिकेमुळे आत्मदहन करण्याची वेळ राऊत यांच्यावर आली आणि त्याबाबत आठ दिवस आधी गटविकास अधिकारी ,पंचायत समिती ,मालेगाव,पोलीस प्रशासन ,मालेगाव,अप्पर जिल्हाधिकारी, मालेगाव यांना लेखी कळून सुद्धा अन्याय कारक कारवाई राऊत यांचेवरच पोलिसांनी का करावी ? कुठलीही घटना अथवा भांडण एकच व्यक्ती करतो काय ?दुसरा काय झोपेचं सोंग घेतो काय ? त्यांचेकडे आक्षेप घेण्यासारखे काहीच नसते का ? हे पोलिसांना का कळू नये ? मग राऊत यांच्यावर च कारवाई का ? चोर सोडून संन्याशाला फाशी ..? अर्थात बिगर मुछ वाला सोडला आणि मुछवाला पकडला आणि गुन्हा दाखल केला हे पोलिसांचे कृत्य अन्याय करणारेच म्हणावे लागेल .कारण वरती सांगितल्या प्रमाणे आत्मदहन करण्याच्या घटनेत फरक असतो तो फरक पोलिसांना का कळू नये ? याचे मोठे आश्चर्य वाटते.नको त्याला टार्गेट करणे हे कृत्य बेकायदेशीर आहे.म्हणून या साठी पत्रकार राजेंद्र राऊत पाटील हे न्यायालयात धाव घेणार असल्याचे राऊत यांनी महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक पत्रकार भारत पवार यांना सांगितले. राऊत यांनी पुढे बोलताना संगीले की ,मी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांचेशी सातत्याने पाठपुरावा करूनही माझ्यावर अन्याय होत राहिला म्हणून शुक्रवार दिनांक २८ आँक्टोबर २०२२ रोजी मी (पत्रकार राजेंद्र राऊत पाटील यांनी) मालेगांवच्या पंचायत समिती कार्यालयासमोर दुपारी दिड वाजता जाहिर आत्मदहनाचा प्रयत्न केला.त्यापूर्वी मी माझ्या न्याय मागण्यांसाठी आत्मदहन करणार असल्याचे पत्र संबधित कार्यालयाना आठ दिवस अगोदरच दिलेले होते.की,व-हाणे येथील पत्रकार भवनाच्या जागेचा प्रश्न तात्काळ सोडवून तेथील तत्कालीन ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांचेवर कठोरात कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी हे आत्मदहन आंदोलन नियोजीत व सबंधित अधिकाऱ्यांना अगोदरच लेखी निवेदने देऊन पुर्वसुचना दिलेली होती.माहे सप्टेंबर २०२२ मध्ये मी पंचायत समितीसमोर केलेल्या वरील मागण्याबाबतच्या उपोषण आंदोलनावेळी पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देताना सांगितले होते की,माहे आँक्टोबर २०२२ मध्ये तुमच्या मागण्या सोडवून न्याय देण्यात येईल.पण…आँक्टोबर संपायला येत असतानाही कारवाई शुन्य….वास्तविक पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन वर्षापासून हा छळ चालविला आहे.वारंवार विनंत्या करुनही पंचायत समिती व सबंधित ग्रामसेविकेकडून माझा सातत्याने छळ करुन मला त्रास दिला गेला.व वेळकाढू भुमिका घेऊन मला कालच्या आत्मदहन आंदोलनापर्यत प्रत्यक्ष बी.डी.ओ.जितेंद्र देवरे,विस्तारधिकारी,व सबंधित ग्रामसेविका यांनी आत्मदहन आंदोलन अर्थात (आत्महत्या) अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळून घेऊन या प्रशासनाचा जाहीर धिक्कार व निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.की,जेणेकरुन माझ्या मेल्यानंतर तरी मला न्याय मिळेल हा उद्देश ठेऊनच हे आंदोलन करण्यात आले* पण… बिगर मुछ वाला सोडून मुछ वाला पसंत करून कारवाई करण्याचे खोटे प्रेम केले ….अर्थात ” चोर सोडून संन्याशाला फाशी” हा प्रकार अन्याय करणारा आहे.तसं बघितलं तर हे आत्मदहन करण्यास मला प्रवृत करणारे बीडीओ,विस्तारधिकारी,सबंधित ग्रामसेविका हे मात्र नामानिराळेच राहिलेत.त्यांचेवर कुठलाही गुन्हा दाखल नाही.आणि मी लोकशाही मार्गाचा अवलंब करुन शांततेच्या मार्गाने माझे आत्मदहन आंदोलन केले म्हणून माझेवर मालेगांव कँम्प पोलिस स्टेशनला आय.पी.सी.३०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला…व्वारे प्रशासन व्वारे मिजासखोरी…आंदोलनाचा आवाज चिरडून टाकण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड…! लाज वाटते प्रशासनाच्या या अशा हलकट कृत्यांचा मी सामाजिक काम करीत असताना माझेवर शंभरही गुन्हे दाखल झालेत.तरी मागे हटणार नाही.तसे तर मी वयाच्या अठराव्या वर्षापासून विविध आंदोलनात भाग घेऊन अनेक प्रश्नात न्याय मिळविला आहे.पण…कालचा शुक्रवार ( ब्लँक फ्रायडे) म्हणून नक्कीच नेहमी स्मरणात राहिल.गेल्या दोन वर्षापासून माझा छळ करुन,मला त्रास देऊन माझी न्याय मागणी पूर्ण न करता व-हाणेत बेकायदेशीर जागा देणाऱ्या ग्रामसेविकेला पाठीशी घालून “आपलेच दात आपलेच ओठ” या न्यायाने माझ्यासारख्या जबाबदार पत्रकारांवर सातत्याने अन्याय करुन छळवाद करणाऱ्या व आत्मदहनास प्रवृत करणाऱ्या बी.डी.ओ.विस्तारधिकारी व सबंधित ग्रामसेविकेवर देखील आत्मदहन(आत्महत्येस) प्रवृत केले म्हणून मी देखील न्यायलयाच्या परवानगीने गुन्हा दाखल करणारच आहे.तृर्तास एवढेच.न्याय मागणा-यांचा आवाज दडपण्यासाठी गुन्हा दाखल करण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न निव्वळ हास्यास्पद ठरतो…मी या घटनेचा तीव्र धिक्कार व मुर्दाड पंचायत समितीच्या गेल्या दोन वर्षापासून छळवाद मांडणा-या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा तीव्र निषेध करतो.* “मायबाप जनहो,तुम्ही फक्त सोबत रहा हिच माझी शक्ती” *मायबाप जनता जनार्दन मी न्यायासाठी केलेल्या आत्मदहन आंदोलनात माझेवर गुन्हा दाखल करुन खरे चोरांना मोकळे सोडले.याचे आश्चर्य वाटते.असो,जोपर्यंत तुमचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे.तोपर्यंत मी लढतच राहिन.अन्यायाच्या ,गैरकृत्याच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळविण्यासाठी श्वासात श्वास असेपर्यत लढेन…फक्त तुमची साथ पाठीशी राहू द्या हीच अपेक्षा!कुणालाही आत्मदहन आत्महत्येस प्रवृत करणे कायद्याने गुन्हा असून आता ती वेळ आली आहे,सबंधित अधिकाऱ्यांनी दोन वर्षापासून चालविलेला छळवाद व त्रास आता त्यांचेविरुध्द न्यायालयात गुन्हा दाखल करुन माझा आवाज अधिक बळकट केला जाईल याची ग्वाही देतो.





