Home Breaking सौ.अनिताताई पवार यांना ” आदर्श आरोग्यरत्न ” पुरस्कार जाहीर !आय.पी. एस...

सौ.अनिताताई पवार यांना ” आदर्श आरोग्यरत्न ” पुरस्कार जाहीर !आय.पी. एस .अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य “प्रतापराव दिघावकर ” यांच्या हस्ते उद्या २५ एप्रिल रोजी पुरस्कार वितरण होणार

0
39
Oplus_131072

भारत पवार : राज्य मुख्यसंपादक  तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना. ९१५८४१७१३१    मालेगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे आयोजित राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ पुरस्कार सोहळा शनिवारी २५ एप्रिल  मालेगाव येथे पार पडणार असून न भूतो न भविष्यती असा हा दिमाख दार सोहळा संपन्न होणार आहे. सोहळ्यास अनेक दिग्गज उपस्थित राहणार असून आय.पी. एस .अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य प्रतापराव दिघावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सौ.अनिताताई भारत पवार यांना देण्यात येणार असल्याचे आयोजक तथा आश्रय आशा फाऊंडेशन चे अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील , सचिव _ आशाताई (अल्काबाई ) बच्छाव  यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले .    सौ. अनिताताई पवार ह्या देशात नावाजलेल्या आणि आजही देशात अग्रेसर असलेल्या ओझर (मिग) येथील  एच ए एल हॉस्पिटल मध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या नोकरीच्या कालावधीत अनेक कटू प्रसंग त्यांनी जवळून पाहिले आहेत तर कोरोना महामारीच्या कालावधीत त्यांनी अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक रुग्णांची सेवा केली. यावेळी त्यांच्या सोबत हॉस्पिटलचे डॉक्टर्स , त्यांचे ड्युटी सोबत असणारे नर्सेस , वार्ड बाय व अन्य कर्मचारी यांनीही आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली आणि रुग्णांना जीवदान दिले. सौ.पवार यांच्या आरोग्य क्षेत्रातील आजही उत्कृष्ट कार्याची विशेष उल्लेखनीय दखल घेऊन आयोजकांनी सौ.अनिताताई भारत पवार यांना   “आदर्श आरोग्यरत्न ” हा पुरस्कार आय.पी.एस.अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य मा. प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान सत्कार सोहळा शनिवारी २५ एप्रिल रोजी   पार पडणार असल्याचे सांगितले. यावेळी राज्यभरातून अनेक पुरस्कार्थी उपस्थित राहणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील यांनी सांगितले.

Oplus_131072

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here