काळजाला चिर पाडणारी घटना

0
21
Oplus_131072

भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१          मुंबई / घाटकोपर : क.टा. महाराष्ट्र न्यूज  ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मुंबई घाटकोपर येथील रमाबाई कॉलनी मधील रहिवासी बौद्ध . हिराबाई दादू महिरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुखद निधन झाले. मुंबई येथील राजावाडी  हॉस्पिटल मध्ये  त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी दोन वेळा त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या होत्या. गेल्या १२ दिवसांपासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. अखेर  आज ( गुरुवारी दि. ५/३/०२६  रोजी ) संध्याकाळी ७ .०० वा.त्यांची प्राणज्योत मालवली.

हिराबाई ह्या सगळ्यांशी मिळून मिसळून राहत होत्या. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता.त्यांचे बोलके व्यक्तिमत्व होते. त्यामुळे रमाबाई कॉलनी मध्ये त्या सगळ्यांच्या प्रिय होत्या. .त्यामुळे येथे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हणतात ना ” जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला. ” त्यांचे दुःखद निधान झाल्याचे समजताच जस काही  ” काळीज चिरल्याची घटना घडली ह्या घटनेमुळे सगळ्यानाच वेदना होत असल्याचे त्यांचे जावई भारतराज पवार यांनी म्हटले. त्यांच्या पश्चात एक मुलगा प्रफुल ( नाना) ,  सून माधुरी , नातू आणि एक मुलगी असा परिवार आहे. महिरे  परिवारावर आणि नातेवाईकांवर  जो दुःखाचा डोंगर कोसळला त्या दुःखात पवार कुटुंब आणि संपूर्ण पवार परिवार सहभागी असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आणि भगवान गौतम बुद्धाच्या कृपेने  हे दुःख सहन करण्याची शक्ती महिरे परिवारास  मिळो आणि मृतात्म्यास चिरशांती मिळो हिच भावपुर्ण श्रद्धांजली…..                   ……..  शोकाकुल                                                               भारतराज सीताताई पांडुरंग पवार ( जावई ),            सौ.अनिता भारतराज पवार  ( मुलगी ) ,                     कु शरयू  आणि कु. ग्रीष्मा भारतराज पवार                  ( नाती ) आणि पवार कुटुंब _ ओझर टाउनशिप  ( निफाड )  / माळवाडी ( देवळा) नाशिक.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here