भारतराज पवार : मुख्य संपादक संपर्क : ९१५८४१७१३१. देवळा : ( दि. १) _ क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ह्या भव्य कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी , सर्व विद्यार्थ्यांनी , विद्यार्थिनींनी घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे माजी पोलिस महानिरीक्षक ( IPS ) मा.डॉ.प्रतापराव दिघावकर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा .प्राचार्य डॉ.हितेंद्र रामराव आहेर उपस्थित राहून मान्यवरांचे स्वागत व सत्कार करणार असल्याचे सांगण्यात आले. तर समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणी विद्यार्थी , शिक्षक, प्राध्यापक आणि मा. रवींद्र दशपुते ( शिक्षण व उद्योजकता ) , मा.संजय हिरे ( उद्योजकता ) यांचा विशेष गुणवंत म्हणून गौरविले जाणार असल्याचे समस्त आयोजकांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलतांना सांगून ह्या समारंभात सगळ्यांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.





