Home Breaking भावडे येथील एस के डी स्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिवस संपन्न

भावडे येथील एस के डी स्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिवस संपन्न

0
79
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटना. मो. ९१५८४१७१३१
देवळा : क.टा.महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  देवळा तालुक्यातील भावडे येथील
एस.के.डी.चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित, एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल भावडे, येथे थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवासा रामानुजन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोर गणितज्ञ श्रीनिवासा रामानुजन यांच्या प्रतिमेला विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधीर सोनवणे तसेच सर्व विभाग प्रमुख,सागर कैलास, बबलू देवरे यांनी हार पुष्प वाहून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रसंगी विद्यार्थ्यांनी गणित या विषयावर एकांकिका व गीत गायन केले. विद्यार्थ्यांनी गणित विषयावर आधारित प्रभात फेरी काढली. विद्यार्थी सानिका शिंदे,कार्तिक खैरनार व चीन्मय ठाकरे यांनी आपले मनोगत विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या विद्यार्थिनी पूर्वा खताळ व अन्वी ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. गणित विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना श्रीनिवासा रामानुजन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणितीय उपकरण व साहित्याचे प्रदर्शन प्रसंगी मांडण्यात आले या सर्व कार्यक्रमाला विद्यालयाचे गणित विभाग प्रमुख संदीप देवरे सदस्य रूपाली पवार, प्रियंका पाटणे,प्रियांका जावडा,माधुरी दराडे, काजल हिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कला विभाग, संगीत विभाग व क्रीडा विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यशस्वीरित्या पार पडलेल्या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे,सेक्रेटरी मीना देवरे, प्राचार्य एस.एन.पाटील,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाच्या शिक्षका रूपाली पवार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here