Home Breaking मोठी दुःखद अपडेट : एकाच कुटुंबातील चिमुकल्यांसह चार जणांची आत्महत्या ,...

मोठी दुःखद अपडेट : एकाच कुटुंबातील चिमुकल्यांसह चार जणांची आत्महत्या , माळवाडी , फुलेमाळवाडी गावात हळहळ

0
101
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक.                      ९१५८४१७१३१                                                   देवळा _ माळवाडी : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात संपूर्ण गावकऱ्यांना सकाळी दुःखाचा  चटका देणारी घटना उघडकीस आल्याने माळवाडी आणि फुले माळवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळी सकाळी येथील नागरिक चहाचा घोट घेण्याच्या लगबगीत असताना अचानक दुःखत घटना घडल्याचे कानावर पडताच दुःखाच्या चटक्यास गावकऱ्यांना सामोरे जावे लागले. हि घटना माळवाडी गावास संपूर्ण देवळा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

फुले माळवाडी येथील गोविंद बाळू शेवाळे ( ४० ) , पत्नी कोमल बाळू शेवाळे ( ३५) , मुलगी खुशी शेवाळे ( ८) , मुलगा शाम शेवाळे ( दीड वर्षे) यांचे मृत देह स्वतःच्या घरात आढळून आले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

युवक गोविंद याने स्वतः दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते तर त्याची पत्नी कोमल , एक मुलगी व मुलगा यांचा मृतदेह पलंगावर झोपलेल्या अवस्थेत प्रथमदर्शनी आढळून आल्याचे समजते.

ही दुखत घटना समजताच देवळा पोलिसांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन चारही जणांचे मृतदेह पुढील तपासणी साठी सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले. घटनेचा पुढील तपास देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक , सह पोलीस कॉन्स्टेबल हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here