भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक 9158417131. सटाणा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क. शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय,लातूर च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला.
देवळा तालुक्यातील निंबोळा येथील नीम व्हॅली रिसॉर्ट येथे शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय लातूर च्या १९९५ बॅच चा ३० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत सर्व वर्गमित्रांचा स्नेह मेळावा आगळ्या वेगळ्या पद्धतीने संपन्न झाला.
यावेळी प्रारंभी काही वर्षापूर्वी मयत झालेल्या वर्गमित्रांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व वर्गमित्र व त्यांच्या धर्मपत्नीसह सामूहिकपणे छत्रपती शिवाजी महाराज,सावित्रीबाई फुले,माता रमाई,सरस्वती मातेच्या प्रतिमांची पुष्पहार अर्पण करून पूजा करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा व आयोजनात आलेल्या अडचणी,मित्रांची मदत व पुढील नियोजन याबाबत श्री.बापूराज खरे यांनी सविस्तर माहिती दिली.यावेळी सर्व वर्गमित्र व त्यांच्या सौभाग्यवती यांनी जोडीने स्टेजवर येऊन ओळख परिचय करून दिला.
यानंतर प्रत्येक वर्गमित्रांनी आपल्या मनोगतात ३०वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यावेळी च्या गमती जमती व घडलेल्या मजेशीर किस्से आपल्या विनोदी शैलीने कथन करून सर्वांना हसरे केले. यानंतर आपण काय व कोणता व्यवसाय करीत आहात यावर प्रकाश टाकण्यासाठी मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आला.
शेवटी आभार प्रदर्शन कार्यक्रमात बऱ्याच वर्गमित्रांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत व पुढील नियोजनाबाबत विचार व्यक्त केलेत. यानंतर सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.
कार्यक्रम संपल्यानंतर बँडबाजा व डी जे च्या गाण्यांवर सर्व वर्गमित्रांनी आपापल्या सौभाग्यवती जोडीदारासह मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला .
या कार्यक्रमाचे नियोजन बागलाण तालुक्याच्या वतीने वर्गमित्र बापूराज खरे, प्रा.विनायक बच्छाव,विजय भामरे,विश्वनाथ वाघ,भाऊसाहेब निकम यांनी उत्कृष्ठपने केल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली.या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रम प्रसंगी सकाळी थंडपेय,नाश्ता, दुपारी बफे जेवण ,चहा घेण्यात आला.
या संपूर्ण दिवसभर चाललेल्या स्नेह मेळाव्याच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी मुंबई,विरार,पुणे,धुळे,जळगाव,नाशिक ,नगर, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वर्गमित्र सर्वश्री प्रकाश साळुंखे,रफिक शाह, बापूराज खरे,विनायक बच्चाव,विजय भामरे , विश्वनाथ वाघ,संजय शेवाळे,साहेबराव पवार,प्रमोद बधान, डॉ.सुरेश मराठे,सुरेश पाटील,संदीप पवार, बापुसाहेब निकम, भिलाजी शिंदे,जीवन साळुंखे, भालचंद्र चव्हाण,युवराज साळुंखे,प्रमोद पाटील चिलानेकर,संजय पाटील, भाऊसाहेब निकम, श्रीराम वाघ,संदीप बच्छाव,प्रकाश गाडद,भरत गांगुर्डे, डॉ.जितेंद्र चिंचोले,रवी पवार,सुभाष पगार,सुनील कापडणीस,नंदू पगार,श्रावण खैरनार ,भास्कर कापडणीस तसेच अनेक वर्गमित्र आपापल्या सौभाग्यवती बहिणीसोबत या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





