भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक . आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी बिनधास्त संपर्क करा. मो.९१५८४१७१३१. रावळगाव : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : रावळगाव पंचशिल नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख उपस्थिती भंन्ते शिलरत्न (अमरावती) यांचे हस्ते तथागत भगवान बुध्द व बोध्दीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले त्यानंतर प्रशांत दादा गरुड जिल्हाअध्यक्ष(रि.पा.ई) यांनी भंन्तेचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच दि.२८ सप्टेंबर ते ७ आॕक्टोबर २०२५ या कालावधीत नांदगाव येथे श्रामणेर शिबीराला बसलेले १२ विद्यार्थ्यांचे देखील स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भंन्तेजींनी धम्म्माचे मार्गदर्शन केले.तत्पूर्वी प्रशांत दादा गरुड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादश्मी १४ आॕक्टोबर १९५६ या दिवशी बुध्दधम्माची दिक्षा देत असताना २२ प्रतिज्ञाही दिल्या आहेत त्याचे पालन जरी आपण केले तरी बुध्दधम्म वाढीस लागेल आपला धम्म वाढविण्यासाठी आपण सर्वांनी त्याचे आचरण करणे गरजेचे आहे.आज देशात धर्मांध शक्ती आपले डोके वर काढत आहेत राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे तरी आपण जागृत होण्याची आज गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.यानंतर प्रा.डॉ.स्वप्निल गरुड यांनी बुध्दवंदना व पंचशिल ग्रहण करुन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरज धिवरे,गोकुळ पवार,हंसराज जाधव,विकास गवळी व प्रसाद उशिरे यांनी परिश्रम घेतले.यावेळी दादाजी केदारे,जिभाऊ उशिरे,अरुण केदारे,भारत अहिरे,संतोष खरे,निलेश केदारे,रोशन केदारे,विश्वनाथ केदारे,रघुनाथ वानखेडे ,बंटी अहिरे,ओम वानखेडे,विशाल पवार, ,यशवंत वानखेडे,शरद वानखेडे,गौतम बोराळे इत्यादी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





