Home Breaking सप्तशृंग गडावर धुवाधार पाऊस , व्यावसायिक नाराज तर भाविकांचे हाल

सप्तशृंग गडावर धुवाधार पाऊस , व्यावसायिक नाराज तर भाविकांचे हाल

0
62

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक                      आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी बिनधास्त संपर्क करा. संपर्क : ९१५८४१७१३१              सप्तशृंगगड : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : अमृत पवार : प्रतिनिधी _  सप्तशृंग गडावर भरगच्च गर्दीने भाविकांच्या उत्साहावर पाऊसाने अचानक तुफान बॅटिंग केल्याने भाविकांचे हाल झाले तर व्यावसायिक नाराज होऊन चिंताग्रस्त झाले. आमच्या महाराष्ट्र न्यूज च्या प्रतिनिधी ने प्रत्यक्ष घेतलेला हा वृतांत
नवरात्रोत्सवाच्या सहाव्या व सातव्या दिवशी सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाल्याने सप्तशृंगगडावर आलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली.
दुपारी वातावरणात उष्मा जाणवत असताना सायंकाळी सातच्या सुमारास पाऊस कोसळू लागला. सुरुवातीला तब्बल २० ते २५ मिनिटे मुसळधार पाऊस झाल्याने मंदिरातून दर्शन घेऊन परतणारे तसेच अन्नपूर्णा प्रसादालयात महाप्रसादाचा लाभ घेऊन निघालेले भाविक अडचणीत आले. अनेकांना दुकाने, पार्किंग याठिकाणी आश्रय घ्यावा लागला, तर काहींनी प्लॅस्टिकच्या घोंगड्यांचा आधार घेत परतीचा मार्ग धरला.रस्त्याच्या या पावसामुळे दुतर्फा दुकाने थाटणाऱ्या लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. भाविकांची गर्दी असतानाच झालेल्या या पावसामुळे व्यावसायिकांचा हिरमोड झाला. नांदुरी परिसरातदेखील पावसाची जोरदार हजेरी लागली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत पावसाने दर्शन दिल्यानंतर मधल्या काही दिवसात विश्रांती घेतली होती. मात्र सहाव्या व सातव्या माळेच्या दिवशी पावसाने मनसोक्त बरसत भाविकांचा उत्साह कमी केला आणि अनेकांना परतीचा प्रवास करावा लागला.
सर्वदूर सुरू असलेल्या परतीच्या पावसाचे सप्तशृंगगडावर आगमन झाले. धुव्वादार बसलेल्या पावसाने चांगलीच धांदल उडाली. सप्तशृंगगडावर रात्रभर पावसाचा जलाभिषेक सुरू राहिला. रविवारी सुट्टीचा वार असताना देखील अपेक्षेप्रमाणे देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली नाही. या पावसाचा फटका भाविकांसह लहान मोठ्या व्यावसायिकांनाही बसला. पावसामुळे बाजारपेठेत काही प्रमाणात शांतता दिसून आली. रविवार हा सुट्टीचा वार असल्यामुळे भविकांच्या संभाव्य गर्दीचा अंदाज बांधून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाने ट्रस्ट प्रशासन, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासनाच्या वतीने बॅरिकेटिंग व रेलिंगचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पावसाने सर्व बिघडवले, एसटी महामंडळाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे भावीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला,लहान मुले व वयोवृध्द नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते, तीन किलोमीटरवरून पायी प्रवास करावा लागत होता, रविवारी पावसाच्या उपस्थितीत सप्तमीला सुरूवात झाली. ट्रस्ट मुख्य कार्यालयातून निघालेल्या अलंकार मिरवणुकीत ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा न्यायाधीश बी.व्ही. वाघ हे सपत्नीक सहभागी झाले होते. रविवार रोजीची पंचामृत महापूजा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व नाशिक जिल्हा पालक न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी सपत्नीक महापूजा केली. यावेळी भगवतीस लाल रंगाची भरजरीचे पैठणी नेसविण्यात आली होती. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी, तहसीलदार रोहिदास वारुळे, ट्रस्टचे विश्वस्त ॲड . ललित निकम, मनज्योत पाटील, व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सहाय्यक मंदिर विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे, मंदिर पर्यवेक्षक सुनिल कासार,राजू पवार उपस्थित होते. तत्पूर्वी शनिवारी (ता. २७) रोजी सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी सपत्नीक देवीचे दर्शन घेतले. यासह रविवारी (ता. २८) रोजी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष तथा न्यायमूर्ती रणजीत मोरे यांनी सपत्नीक देवीचे दर्शन घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here