भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी बिनधास्त संपर्क करा. मो.९१५८४१७१३१
सप्तशृंगगड : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क _ अमृत पवार _ प्रतिनिधी _
श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक सहभागी होत आहे. राज्याबाहेरील भाविकांची संख्याही वाढत आहे. सोमवारी पहिल्या माळेला झालेल्या हलक्याशा बरसातीमुळे भाविकांची तारांबळ उडाली तर मंगळवारी पहाटे पासून सुरू झालेल्या पावसामुळे भाविकांची गर्दी रोडावली होती. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे भविकांचा दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. शुक्रवार, हा देवीचा वार असल्यामुळे सप्तशृंगगडावरील बसस्थानक पासून भगवती भाविकांचे जथ्थे मंदिराकडे जाताना पाहायला मिळाले. शुक्रवारी, (ता. २६) देवीचा गाभारा नारंगी – पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजविल्यामुळे आकर्षक दिसत होता. शुक्रवारी सकाळ सत्रात पावसाने हजेरी लावल्याने भाविक व व्यावसायिकांची तारांबळ उडाली.
शुक्रवार, (ता.२६) रोजी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व ठाणे विभागाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील व श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त अॅड दीपक पाटोदकर यांनी सपत्नीक श्री भगवतीची पंचामृत महापूजा केली.कळवणचे पोलिस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नांदूरी ते सप्तशृंगगड मार्गावर भविकांना दर १० मिनिटाला बस उपलब्ध आहेत. सध्या ९० बस उपलब्ध असून कळवण परिवहन आगाराचे व्यवस्थापक राहुल बोरसे व त्यांचे सहकारी यासाठी कार्यरत आहेत. यावेळी पोलिस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, सप्तशृंगगड ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदिप बेनके, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सहाय्यक मंदिर विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे, मंदिर पर्यवेक्षक सुनिल कासार,राजू पवार उपस्थित होते.





