Home Breaking सप्तशृंगी गड गर्दीने फुलला !आज पहाटेच्या महापुजेचे मानकरी ठरले खा.भास्कर भगरे

सप्तशृंगी गड गर्दीने फुलला !आज पहाटेच्या महापुजेचे मानकरी ठरले खा.भास्कर भगरे

0
71
Oplus_131072

भारतराज पवार  , राज्य मुख्यसंपादक.                    आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी बिनधास्त संपर्क करा. ९१५८४१७१३१

सप्तशृंगी गड: कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : अमृत पवार _ थेट गडावरून _ 
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाने गडावर चैतन्य अवतरले आहे. राज्यभरातील हजारो भाविकांच्या गर्दीने सप्तशृंगगड व देवी मंदिर परिसर फुलून गेला असून, गुरुवारी हजारो भाविकांनी मनोभावे देवीचे दर्शन घेतले. प्रांतसमयीची काकड आरती, अलंकार मिरवणूक, दैनंदिन पंचामृत अभिषेक, महानैवेद्य आरती, सांज आरती ह्या उपक्रम होत आहेत. सायंकाळी देवीची स्तुती म्हणून पुरोहित वर्गांकडून खडगबाण सादर केले जातात. पहिल्या पायरी जवळील यज्ञकुंड परिसरात महिलांनी घट बसले आहेत. नवरात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानतर्फे ठिकठिकाणी पिण्याचे पाणी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसर, शिवालय सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असून पायरी मार्गाने दर्शनासाठी जाण्याचा वेगळा मार्ग यासह परतण्याचा वेगळा मार्ग आहे.
गुरुवारी (ता.२५) रोजीची देवीची पंचामृत महापूजा दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे, देणगीदार भाविक सुदर्शन हेगडे यांनी केली. पंचामृत महापूजेच्या आरती प्रसंगी भाविकांनी गाभारा व सभामंडप गच्च भरलेला होता. ट्रस्टच्या कार्यालयातून भगवतीच्या अलंकरांची सवाद्य मिरवणूक काढत अलंकार मंदिरात नेण्यात आले. पंचामृत महापूजेप्रसंगी विश्वस्त संस्थेचे गुरुवारी, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे या विश्वस्त संस्थेचे माजी अध्यक्ष तथा न्यायाधीश वर्धन देसाई, धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव, रंजन ठाकरे आदींनी दर्शन घेतले. यावेळी विश्वस्त अॅड ललित निकम, मनज्योत पाटील, व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सहाय्यक मंदिर विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे, मंदिर पर्यवेक्षक सुनिल कासार, राजु पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here