Home Breaking तिसऱ्या माळेला अंबे उद्योस्तू च्या जयघोषाने ” सप्तशृंगीगड ” निनादला ,लाखो भाविक...

तिसऱ्या माळेला अंबे उद्योस्तू च्या जयघोषाने ” सप्तशृंगीगड ” निनादला ,लाखो भाविक देवी चरणी

0
66

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक.                     संपूर्ण राज्यात आणि राज्यातील घराघरात घरातील प्रत्येकाच्या मनामनात  आपली बातमी व जाहिरात पोहचण्यासाठी संपर्क करा. ९१५८४१७१३१ 

सप्तशृंग गड  : कटा महाराष्ट्र न्यूज : ऑनलाइन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : अमृत पवार / प्रतिनिधी _ 
आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर तिसऱ्या माळेला भगवतीचा दरबार भाविकांच्या गर्दीने फूलला होता . शारदीय तिसऱ्या माळेला श्री भगवतीस राणी रंगाची भरजरीची पैठणी नेसविण्यात आली. बुधवारी, (ता. २४) रोजी सप्तशृंगगडावर पावसाळी वातावरण होते मात्र; पावसाने उघडीप घेतल्यामुळे भाविकांची दर्शनासाठी रेलचेल पाहायला मिळाली.
बुधवारी, (ता. २४) रोजी सप्तशृंगगड परिसरात पावसाळी वातावरण होते. मात्र पावसाने उघडीप घेतल्यामुळे दर्शनार्थी भविकांचा मंदिराकडे जाण्यासाठीचा ओघ दिसून आला. तिसऱ्या माळेची पंचामृत महापूजा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मनज्योत पाटील यांनी परिवारासमवेत केली. यावेळी देवीला राणी रंगाची भरजरीची पैठणी नेसविण्यात आली. ट्रस्टच्या कार्यालयातून देवीच्या अलंकारांची मिरवणूक काढत हे अलंकार मंदिरात नेण्यात आले. संपूर्ण साजशृंगार केल्यानंतर हे अलंकार श्री भगवतीस परिधान करण्यात आले. यात डायमंड जडीत सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची वज्रटिक, सोन्याचे पुतळ्यांचे गाठले, सोन्याचा मयूर हार, सोन्याचे कर्णफुले, सोन्याचे नथ, सोन्याचे पाऊल, चांदीचा कमरपट्टा, चांदीचा मुगुट यांचा समावेश आहे. यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, मंदिर विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे, पर्यवेक्षक सुनिल कासार उपस्थित होते.
================
उत्सव कालावधीत विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून भाविकांसाठी विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. विश्वस्त संस्थेच्या धर्मार्थ रुग्णालयात मोफत उपचार सुविधा उपलब्ध आहे. यासाठी उत्सव कालावधीत आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. राम टप्पा व गणपती मंदिर परिसरात प्राथमिक उपचारासाठी मविप्र रुग्णालयाच्या डॉक्टरांची चमू कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here