Home Breaking देवळा येथे भयावह शांतता , देवळा _नाशिक रस्त्यावरील व्यावसायिकांनी स्वतःहून टपऱ्या काढल्या,...

देवळा येथे भयावह शांतता , देवळा _नाशिक रस्त्यावरील व्यावसायिकांनी स्वतःहून टपऱ्या काढल्या, पोलिस सावधान मोडमध्ये तर टपऱ्या ॲक्शन मोडमध्ये

0
87
Oplus_0

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक                       विलास माळी : राज्य उपसंपादक                   संपर्क : ९१५८४१७१३१.                                         देवळा : कटा. महाराष्ट्र न्यूज : ऑनलाइन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा येथील देवळा _ नाशिक रस्त्यावरील टपरीधरकांनी स्वतःहून टपऱ्या  काढून घेतल्याने रस्त्याने मोकळा श्वास सोडला मात्र  येथे भयावह शांतता पसरली आहे . टपरी धारक निराश होऊन टपरी स्वतःहून हटवत आहेत तर काढलेले अतिक्रमण पाहण्या साठी बघ्यांची गर्दी होत असली तरी येथे भयावह शांतता पसरलीआहे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था येथील व्यापाऱ्यांची झाली आहे. जरी अतिक्रमण केले असले तरी येथील सर्व टपरी धारकांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते .असे मत महाराष्ट्र न्यूज चे राज्य मुख्यसंपादक तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्य उपाध्यक्ष भारतराज पवार यांनी आपल्या लेखणीतून व्यक्त केले आहे. प्रत्येक टपरीधारक व्यावसायिकाचा पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक टपरी धारकांनी चिंता व्यक्त केली आहे.याचे गांभीर्य शासनाने घेतले नसून व्यावसायिकांच्या पोटगी वरच जेसीबी फिरवला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शासन फक्त एवढेच पहात आहे की अतिक्रमण केले आहे आणि ते स्वतःहून काढा अन्यथा आम्ही जेसीबीने भुई सपाट करू असा इशारा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते. परंतु ह्या सर्व अतिक्रमण धारकांनी केंद सरकारच्या सदस्यास मतदान केले ते चालले मग टपरीत धारकांचे पुनर्वसन का केले जाऊ नये हा महत्वाचा मुद्दा येथे उपस्थित करण्यात आला. रस्ता काढण्यास अतिक्रमण धारकांचा विरोध नाही अनेकांनी स्वतःहून टपऱ्या काढल्या पण त्यांचे पुनर्वसनाचे काय ? हा प्रश्न महत्वाचा आहे.

विंचूर _ प्रकाशा हा राष्ट्रीय महामार्ग देवळा शहरातून जात असल्याने टपरी धारकांचे मात्र तोंडचे पाणी पळाले आहे. तर सटाणा _ देवळा रस्त्यावरील व्यावसायिकांनी व्यवसाय बंद करून उपोषणाचे शस्त्र उपसले होते. टपरी धारकांन बाबत तात्काळ योग्य तोडगा काढण्याचे निवेदन मंडळ अधिकारी सुवर्णा थेटे यांना देण्यात आले.यावेळी पोलिस निरीक्षक सार्थक नेहते, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर आदी उपस्थितीत होते.मोठी अपेक्षा ठेऊन उपोषण मागे घेण्यात आले. व्यापाऱ्यांच्या ह्या अपेक्षेवर केंद्र सरकार हरताळ फासणार की पुनर्वसन करणार ? हे पाहणे म्हणजे येथील व्यापाऱ्यांनी  स्वतःचे काळीज हातात घेतल्या सारखे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे पहात आहेत. तर येथील समता परिषदेचे व टपरी धारक आबा खैरनार यांनी १५ ऑगस्ट रोजी पाच कंदील जवळ सहकुटुंब  रास्ता रोको व अन्नत्याग आंदोलन करणार अशी घोषणा केल्याने येथे भयावह शांतता निर्माण झाली  आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेले व्यापारी आणि त्यांच्यावर असली संक्रांत ओढवल्याने एखाद्या कुटुंबात अघटीत घटना घडू शकते असेही खैरनार यांनी यावेळी म्हटले. तर पोलिसांची जादा कुमक वाढवल्याने पोलिस सजग, सावधान मोड मध्ये असल्याचे पाहायला मिळते. तर टपऱ्या मात्र ॲक्शन मोडमध्ये आहेत .

बघ्यांची गर्दी आणि  दबक्या आवाजात चर्चा करतांना नागरिक
देवळा _ सटाणा रस्त्यावरील  उजव्या बाजूला अतिक्रमण  काढताना जेसीबी आणि बघ यांची गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here