Home Breaking जगण्याचा नवा आदर्श : महिलांना सक्षम , आरोग्यदायी बनवणे माझं ध्येय _...

जगण्याचा नवा आदर्श : महिलांना सक्षम , आरोग्यदायी बनवणे माझं ध्येय _ आशाताई अहिरे

0
85
Oplus_0

भारतराज  पवार _ राज्य मुख्यसंपादक  :        ९१५८४१७१३१                                       मालेगाव : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क सोयगावमध्ये आरोग्याची नवी पहाट अर्थात नवा आदर्श आशाताई प्रकाशआबा अहिरे यांच्या पुढाकाराने सुरू झाला महिलांसाठी मोफत योगाभ्यास.

काही महिन्यांपूर्वी दारूच्या अड्ड्याने बदनाम झालेल्या सोयगाव ग्रामपंचायत हद्दीत आता एक सकारात्मक बदल घडतोय. जिथे कधी काही टवाळखोर तरुणांची गर्दी असायची, तिथेच आता सकाळी सूर्य उगवण्याआधी महिलांचा उत्साहाने भरलेला योगासने करताना दिसतोय.

या परिवर्तनामागे आहेत माजी नगरसेविका आशाताई प्रकाश आबा आहिरे. त्यांनी परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने काही महिन्यांपूर्वी चुकीच्या कृत्यांना आळा घालून तिथे शिस्त निर्माण केली. आणि आता त्या जागेचा उपयोग आरोग्यदायी उपक्रमासाठी करत आहेत.

प्रत्येक सकाळी ६ ते ७ दरम्यान महिलांसाठी मोफत योगा वर्ग सुरू करण्यात आले असून सध्या सुमारे २० महिलांचा नियमित सहभाग आहे.
या उपक्रमामुळे महिलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल जाणवत असून, “आम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतोय, आणि शरीराला उर्जा वाटतेय,” असं एक मत योगा करणाऱ्या महिलांपैकी एकाने व्यक्त केलं.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी योग हा उत्तम मार्ग आहे, असं मत आशाताईंनी व्यक्त केलं.

“महिलांना सक्षम, आरोग्यदायी आणि जागरूक बनवणं हे माझं ध्येय आहे,” असं आशाताईंनी सांगितलं.

सोयगावमध्ये घडणारा हा आरोग्यदायी बदल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गावात योगा उपक्रमाची सुरुवात म्हणजे केवळ आरोग्याचं नव्हे, तर सामाजिक सुधारणेचंही एक सकारात्मक पाऊल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here