भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क साधावा : ९१५८४१७१३१
पिंपळगाव(वा.) कटा महाराष्ट्र न्यूज : शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे अवलोकन करून विविध उपक्रमात गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या माळवाडी ग्रामपंचायतीने टीबीमुक्त गाव अभियानात सहभागी होत. ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केले. ह्या मोहिमेसाठी डॉ. जयराम सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. सोमवार (ता. ३०) रोजी नाशिक येथील कालिदास कलामंदिर येथे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्यांना सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानाच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात सरपंच अलकाबाई पवार, उपसरपंच मयूर बागूल, ग्रामसेवक एस. एस. देवरे यांचे अभिनंदन करून पुरस्कार वितरण करण्यात आले. प्रशस्तीपत्र, महात्मा गांधी यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन माळवाडी ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. यावेळी दावल भदाणे, जयवंत गोसावी , ग्रामपंचायत सदस्य हर्षाली बच्छाव, तात्याभाऊ भदाणे, कल्पना शेवाळे, प्रविण गांगुर्डे, अरुणा पवार, हेमंत बागुल, नेहा बागुल, गायत्री आहिरे, ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनवणे, अमित सोनवणे, रुपाली आहेर आदि उपस्थित होते.





