Home Breaking दारूच्या नशेत किरकोळ वाद घडला, संतोष उर्फ ज्वाल्या ने दीपक वर चाकूचा...

दारूच्या नशेत किरकोळ वाद घडला, संतोष उर्फ ज्वाल्या ने दीपक वर चाकूचा वार करून जीवच घेतला : मटाने येथील घटना , वातावरण तंग ,पोलीस बंदोबस्तात वाढ

0
89
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक                      आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.संपर्क : ९१५८४१७१३१

देवळा : कटा टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मटाने गावी दुपारी ४ वा.च्या सुमारास येकास छातीत चाकूने वार करून खून केल्याने मोठी खळबळ माजली असून गावातील वातावरण तंग झाले होते.देवळा पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती हाताळली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मटाने येथील दीपक निंबा साबळे ( ४५) व संतोष उर्फ ज्वाल्या  पवार ( ३८) हे दोघ मित्र होते.सकाळ पासून दोघे एकाच जागी दारू पित होते मात्र दोघात किरकोळ वाद घडला आणि वादाचे पर्यवसान जोरदार भांडणात झाले हा वाद मिटला असताना संतोष उर्फ ज्वाल्या याने साबळे यास पुन्हा रस्त्यावर बोलावले साबळे राहत असलेल्या घराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या चिकन दुकाना जवळ पुन्हा संतोष उर्फ ज्वाल्या याने पुन्हा कुरापत काढून दीपक निंबा साबळे यास चाकूने छातीत वार केले ही घटना गावातील नागरिकांना कळताच अनेकांनी धाव घेत दीपक यास उपचारार्थ देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दीपक साबळे यास मृत घोषित केले.

ही घटना देवळा पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ घाव घेत परिस्थिती हाताळली मात्र मटाने गावात नातेवाईकांचा मोठा आक्रोश घटना बघणाऱ्यांचे हृदय पिळवटून टाकणारे होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये व कायदा आणि सुव्यवस्था राहावी म्हणून कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून मयताची बहीण अंजनाबाई निकसे यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून मयत दीपक साबळे यांच्या पत्नीने मोठा आक्रोश करत माझे लहान , लहान मूल असून त्यांचे पुढे काय होणार ? असे म्हणून संशयित आरोपी संतोष उर्फ ज्वाल्या यास फाशीची सजा झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

पुढील तपास पो.निरीक्षक  ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दामोधर काळे, सहाय्यक पो. उ. नि.विनय देवरे ,आर.बी. बच्छाव , आय.पाटील , पो.हवा.ज्योती गोसावी हे करत आहेत.

Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here