June 27, 2022

बागलाण : तरसाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगलाबाई मोहन तर उपसरपंच पदी काळू पिंपळसे

1 min read


वासोळ : क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज “ _ नेटवर्क _
तरसाळी ता.बागलाण येथिल ग्रामपचांयतीच्या सरपंच उपसरपंच पदासाठी शुक्रवारी (दिं.१२) निवडणूक निर्णय अधिकारी एन पी मेधने यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सरपंच पदासाठी मंगलबाई मोहन तर उपसरपंच पदासाठी सर्वानुमते काळू पिंपळसे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. या प्रक्रियेत विरोधी गट पूर्णपणे तटस्थ राहिल्याने सरपंचपदी मगंल मोहन तर उपसरपंच पदी विर एकलव्य सघंटणेचे काळु पिंपळसे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. या निवडीनंतर थोर महापुरुषांच्या प्रतिमापुजन करण्यात आले, समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण केली.
ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राकेश रौदंळ, प्रभाकर पवार, लखन पवार यांच्या नेत्रुत्वाखाली कै.रमेश दादा रौदंळ प्रणित समर्थ ग्रामविकास या सत्ताधारी पॅनलने अपेक्षेनुरूप सलग दुसऱ्यांदा बाजी मारली असून या निवडणुकीत सत्ताधारी गटाला ६ तर विरोधी गटाला ३ जागा मिळाल्या आहेत. यानंतर निघालेल्या सरपंचपदाच्या आरक्षणातही पुन्हा एकदा ह्या गटाला नशिबाची साथ मिळाली असून सरपंच पद ना.म.प्र.ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झाले आहे. आरक्षित एकमेव जागाही मंगलबाई मोहन यांच्या रूपाने ह्या गटाकडेच असल्याने मोहन परिवाराला तब्बल चाळीस वर्षानंतर गावाचे सरपंच पद मिळाले आहे. निवडणुक कामी तलाटी स्नेहल आहीरे, ग्रामसेवक एन.एम.देवरे, कर्मचारी विजय रौदंळ, बाळा सोनवणे,मोठाभाऊ बागुल आदीनीं सहकार्य केले, यावेळी ग्रां पं सदस्य लखन पवार, नामदेव बोरसे, निंबाबाई माळी, कमल गांगुर्डे, आदीसह तात्याजी रौदंळ, मन्साराम जाधव, सुरेश रौदंळ, प्रभाकर पवार,राकेश रौदंळ,अरूण मोहन,भिका रौदंळ, रामदास पवार, खडुं मोहन, प्रकाश मोहन, रोहिदास सोनवणे, शिवाजी सोनवणे, शामा पिपंळसे, देवाजी वाघ, त्रबंक गागुंर्डे, विठोबा पिपंळसे, प्रभाकर रौदंळ, यादु चव्हाण, जिभाऊ माळी, मजीं जाधव, साहेबराव रौदंळ, विजय पवार, सुरेश पिपंळसे, गोपिनाथ मोहन,पुडंलिक रौदंळ, रमेश मोहन, जयराम मोहन, बापु वाघ, भैया वाघ, बाळु मोहन, निखिल जाधव, किरण जाधव, रोहीत पवार, नानाजी पवार, मुन्ना जाधव, गणेश रौदंळ, सुरेश पवार, सजंय पवार, रविद्रं पवार,भरत सोनवणे, अर्जुन मोहन, भरत माळी, शरद महिरे, कमलाकर मोहन, धर्मराज मोहन, देविदास मोहन, बाळु शेवाळे, पाडुंरगं मोहन, तुकाराम मोहन, बापु मोहन, श्रावण शेवाळे, पोर्णिमा जाधव, मिना पवार, रत्ना जाधव, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहिजेत : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्याच्या घरा घरात पोहोचलेले क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज” साठी पत्रकार आणि संपादकांच्या विविध जागांसाठी नियुक्ती करण्यात येत आहे ,तसेच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या साठी संपर्क करा : भारत पवार मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.