
मालेगाव / चंदनपुरी _ दि.१२ . क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” नेटवर्क _ रविराज सोनार _मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवड बिनविरोध पार पडली.
सरपंचपदी शिवसेना प्रणित शिव मल्हार पॅनलचे विनोद निंबा शेलार तर उपसरपंचपदी अशोक दोधा अहिरे (माजी सैनिक) यांची बिनविरोध निवडीची घोषणा अध्यासन अधिकारी किरण शिंदे यांनी केली. त्यांना ग्रामसेवक ए जे चव्हाण, लिपिक शालींदर जीवरक यांनी सहाय्य केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार, सौ दीपाली सोनवणे, सौ वैशाली पाटील, मनोहर जोपळे, सोनाली शेलार, मनीषा पवार, सरला अहिरे, कैलास शेलार, सविता सोनवणे, आदी उपस्तिथ होते व चार सदस्य गैरहजर होते.
बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज्याचे कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी सरपंच विनोद शेलार, व उपसरपंच अशोक अहिरे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी किल्ला पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
* अल्पावधीत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्याच्या घराघरात पोहोचलेलेआणि मानवाच्या मनामनात रुजलेले कसमादे टाईम्स “महाराष्ट्र न्यूज ” साठी आपल्या परिसरातील घडामोडी तसेच इतर बातम्या व जाहिरातीसाठी तात्काळ संपर्क करावा ,तसेच पत्रकार आणि संपादकांच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे .संपर्क : भारत पवार, मुख्य संपादक, महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131
